अहमदाबाद: आयपीएल २०२३च्या हंगामाला सुरूवात होण्यास फक्त २४ तासांचा कालावधी शिल्लक आहे. जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय असलेल्या या टी-२० लीगचा थरार उद्यापासून पुढील दोन महिने अनुभवता येणार आहे. ३१ मार्च रोजी नव्या हंगामातील पहिली लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन संघात होणार आहे. चेन्नईने चार विजेतेपद तर गुजरातने पहिल्याच हंगामात विजय मिळवण्याची कामगिरी केली आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या हंगामात अनेक मोठे विक्रम झाले आहेत. आता नव्या हंगामात यातील अनेक विक्रम मोडले जातील. आतापर्यंत लीगमध्ये असे अनेक विक्रम झाले आहेत जे वाचल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल.

१) इंडियन प्रीमियर लीग ही जगभरात इतकी लोकप्रिय आहे की २०१० साली याचे थेट प्रसारण यूट्यूबवरून करण्यात आले आहेत. अशा प्रकारे यूट्यूबवरून एखाद्या स्पर्धेचे थेट प्रसारण करण्याची ती पहिली वेळ होती.

२) २०१८ साली आयपीएलच्या टीव्ही प्रसारणाच्या अधिकारासाठी स्टार इंडिया नेटवर्कने १६३.४७५ मिलियन डॉलर खर्च केले होते. यावेळी ही स्पर्धा जिओ सिनेमावर फ्रीमध्ये दाखवली जाणार आहे.

३) आयपीएलमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला देखील फायदा झाला आहे. आयपीएलचे GDP मध्ये मोठे योगदान आहे. यामुळे प्रत्येक वर्षी १८० मिलियन डॉलर पेक्षा अधिक उत्पन्न आणि खर्च होतो.

IPLमुळे रोहित शर्माला कशाची भीती वाटते? बोलून दाखवली मनातील सर्वात मोठी शंका आणि चिंता
४) ही गोष्ट वाचून तुम्हाला अश्चर्च वाटेल की आयपीएलमध्ये अधिकतर सामने दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळी होतात. यामुळे आयपीएलचे हायलाईट्स सातत्याने उपलब्ध करुन दिले जातात. पहिल्या हंगामात हे आयलाईट्स २४० मिलियन वेळा पाहिले गेले होते.

५) आयपीएल ही आतापर्यंतची अशी पहिली लीग आहे जी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मंजूरी शिवाय सुरू झाली आणि तिला आतापर्यंत सर्वाधिक यश मिळाले.

६) आयपीएलची सुरुवात २००८ साली झाली आणि या लीगला जगभरात लोकप्रियता मिळाली कारण प्रथमच एका लीगमध्ये देशातील आणि परदेशातील खेळाडू एकाच संघाकडून खेळताना दिसले.

७) आयपीएलची लोकप्रियता इतकी आहे की २०१७ साली याच्या प्रसारणाचे अधिकार सोनी सिक्स, सोनी ESPN आणि सेट मॅक्सला विकण्यात आले. ज्यामुळे त्याची लोकप्रियता जगभरात अधिक पोहोचली.

८) प्रत्येक वर्षी आयपीएलमधील एक संघ एका सामन्यात हिरवी जर्सी घालते. जगभरात सुरू असलेल्या गो ग्रीन या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ हिरवी जर्सी घालते.

IPLमधील कर्णधारांना मिळणार ‘सुपर पॉवर’; अखेरच्या क्षणी घेता येणार मॅचचा निकाल बदलवणारा निर्णय
९) आयपीएलमध्ये सुरुवातीला ८ संघ होते आता ही संख्या १० इतकी झाली आहे.

१०) मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये सर्वाधिक ५ विजेतेपद मिळवली आहेत. ही सर्व विजेतेपद रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आली आहेत.

११) IPLमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने स्पर्धेत ३५७ षटकार मारले आहेत. गेलने स्पर्धेत कोलकाता, बेंगळुरू आणि पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

१२) या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्रावोच्या नावावर आहे. त्याच्या नावावर १८३ विकेट आहेत.

१३) आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने आतापर्यंतच्या सर्व हंगामात मिळून ६ हजार ६२४ धावा केल्या आहेत.

१४) अमित मिश्राच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा हॅटट्रिक घेण्याचा विक्रम आहे. त्याने आतापर्यंत ३ वेळा ही कामगिरी केली आहे.

आयपीएलमधील प्रत्येक संघात १८ ते २५ खेळाडू असतात. प्रत्येक संघात परदेशी खेळाडूंची संख्या जास्ती जास्त ८ इतकी असू शकते. तर मॅचमध्ये ४ परदेशी खेळाडूंना खेळवता येते. लीगमध्ये असे खेळाडू देखील खेळतात ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नाही आणि असे देखील ज्यांनी निवृत्ती घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here