भोपाळ: खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी ११ महिन्यांच्या चिमुकलीच्या फुफ्फुसातून मिनी एलईडी बल्ब काढला आहे. बल्ब बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना ओपन सर्जरी करावी लागली. चिमुकलीच्या फुफ्फुसातून बाहेर काढण्यात आलेल्या एलईडी बल्बचा आकार ५ मिलीमीटर इतका आहे. बल्ब मुलीच्या श्वसननलिकेतून फुफ्फुसाच्या खालील भागापर्यंत पोहोचला. त्यामुळे मुलीला श्वास घेताना त्रास होऊ लागला.शस्त्रक्रिया करण्यास उशीर झाला असता चिमुकलीच्या जीवाला धोका निर्माण झाला असता, अशी माहिती डॉ. ब्रिजेश लाहोटी यांनी दिली. ‘शस्त्रक्रियेला विलंब झाला असता तर बल्बमुळे फुफ्फुसाला संसर्ग होण्यास सुरुवात झाली असती. त्यामुळे गंभीर स्वरुपाचा न्युमोनिया होण्याचा धोका होता. बहुतेकदा अशा वस्तू फुफ्फुसातून काढण्यासाठी लेप्रोस्कोपीचा वापर केला जातो. पण मिनी एलईडी बल्ब फुफ्फुसाच्या खालच्या भागात अडकलेला असल्यानं लेप्रोस्कोपीचा पर्याय करता आला नाही,’ असं लाहोटी म्हणाले.
स्मशानात रोज रात्री प्रेतयात्रा यायच्या, चिता पेटायच्या; संशयावरून पोलिसांचा छापा अन् मग…
मुलीचे कुटुंबीय खंडव्याचे रहिवासी आहेत. तिथून ते इंदोरला उपचारांसाठ आले होते. चिमुकलीला श्वास घेताना त्रास होत असल्याची तक्रार घेऊन त्यांनी रुग्णालय गाठलं. ‘आम्ही मुलीची प्राथमिक तपासणी केली. तिच्या उजव्या फुफ्फुसात आम्हाला एक लहानशी वस्तू दिसली. ती बाहेर काढण्यासाठी आम्ही लेप्रोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. पण ती वस्तू फुफ्फुसाच्या खालील भागात अडकली असल्याचं आमच्या नंतर लक्षात आलं. त्यामुळे मग आम्ही लेप्रोस्कोपीचा विचार रद्द केला,’ अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

वस्तू संवेदनशील भागात असल्यानं ओपन सर्जरी करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. जवळपास दीड तास शस्त्रक्रिया चालली. डॉक्टरांनी मिनी एलईडी बल्ब काढला. यानंतर मुलीची प्रकृती सुधारली. तिला आज डिस्चार्ज देण्यात आला. डॉ. श्याम इनानी आणि ऍनेस्थेशियातज्ज्ञ डॉ. भगवती रघुवंशी यांनीदेखील मुलीचा जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here