मुंबई:
जेएनयूत रविवारी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी सोमवारी सायंकाळी रस्त्यावर उतरले. वांद्रे येथील कार्टर रोडवर या सेलिब्रिटींनी जमून निदर्शने केली. दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू, दिया मिर्झा, गोहर खान, अभिनेता राहुल बोस, अनुभव सिन्हा आदी सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते. त्यांच्यासोबत परिसरातील सर्वसामान्य नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘Enough’ (पुरे झाले आता!) असे फलक हातात झळकवत हे सेलिब्रिटी शांतपणे आंदोलन करत होते. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त होता. नेहमी ट्विटरवरूनच प्रतिक्रिया व्यक्त करणारे सेलिब्रिटी गेले काही दिवस प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत. जामिया मिलिया इस्लामिया हिंसेच्या वेळीही ऑगस्ट क्रांती मैदानात झालेल्या आंदोलनात या सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता.

अनुभव सिन्हा यांनी सुधीर मिश्रा, विशाल भारद्वाज, दिग्दर्शक रीमा कागती, दिग्दर्शक झोया अख्तर, दिया मिर्झा आणि अंकुर तिवारी या सेलिब्रिटी आणि कलाकारांनी खार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून या आंदोलनाची रितसर परवानगी मागितली होती.

तत्पूर्वी, सोमवारी दिवसभरात देशभर जेएनयूतील हल्ल्याचे पडसाद उमटत आहेत.


Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here