जे रुग्ण आपल्या वैयक्तिक औषधे आयात करतात अशा लोकांनाच ही सवलत मिळणार आहे. या बरोबरच कर्करोगावर उपचार करणाऱ्यांसाठी वारलय् जाणाऱ्या Pembrolizumab (Keytruda) वर देखील सरकारने सूट दिली आहे. या सुटीचा लाभ घेण्यासाठी रुग्णाला ( वैयक्तिक आयातदाराला) केंद्र किंवा राज्य आरोग्य सेवा संचालक, जिल्हा वैद्यकीय अधिकारी किंवा जिल्ह्यातील सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.
अशा औषधांसाठी १० टक्के इतके मुलभूत शुल्क आकारले जाते. तसेच जीवनरक्षक औषधे आणि इंजेक्शनवर ५ टक्के कर आकारला जातो. स्पायनल मस्कुलर अॅट्रॉफी किंवा ड्यूचेन मस्कुलर डिस्ट्रॉफीच्या उपचारांसाठी काही औषधांना सूट देण्यात आलेली आहे. अशात इतर दुर्मिळ आजारांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांसाठी कस्टम ड्युटीच्या सवलतीसाठी अनेक लोकांनी विनंती केली. ही मागणी लक्षात घेत सरकारने हा निर्णय घेतला आहे.
लोकांना मिळणार मोठा दिलासा
दुर्मीळ आजारांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे किंवा विषेश अन्न महागडी असतात. ही औषधे आयात केली जातात. असे काही दुर्मीळ आजार आहेत, ज्यांवर उपचार करण्यासाठी वर्षाला १० लाख रुपये ते १ कोटी रुपये किंवा अधिक खर्च येऊ शकतो. रुग्णाचे वय आणि वजनानुसार औषधांचा डोस आणि किंमत वाढत असते. केंद्र सरकारने दिलेल्या या आयात शुक्लाच्या सुटीमुळे देशातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.