जयपूर: राजस्थानमध्ये भीषण अपघात झाला आहे. सरकारी रुग्णवाहिकेच्या चालकानं उड्डाणपुलावर दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरून पती, पत्नी आणि आजी, नातू प्रवास करत होते. अपघातात जोडप्याचा मृत्यू झाला आहे. कोटा येथील गुमानपुरा उड्डाणपुलावर आज सकाळी साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत होता.धारदेवी आणि यूआयटी ऑडिटोरियमला २ रुग्णवाहिका जाणार होत्या. अपघाताच्या काही वेळापूर्वीच कंट्रोल रुमशी संवाद झाला होता. यूआयटी ऑडिटोरियमला जाणारी रुग्णवाहिका सुरेंद्र घेऊन जाणार होता. मात्र कर्मचाऱ्यांनी तो मद्यधुंद स्थितीत असल्याचं सांगितलं. त्यामुळे त्याच्या जागी दुसऱ्या चालकाला रुग्णवाहिका नेण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र सुरेंद्रनं ऐकलं नाही आणि तो रुग्णवाहिका घेऊन गेला, अशी माहिती मुख्य आरोग्य अधिकारी असलेल्या डॉ. जगदिश सोनी यांनी सांगितलं.
गुमानपुरा उड्डाणपुलावर चढत असताना सुरेंद्रनं वेग वाढवला. त्यामुळे त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. यानंतर रुग्णवाहिका दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला गेली. एरोड्रामहून नयापुराला जात असलेल्या दुचाकीला रुग्णवाहिकेनं धडक दिली. या दुचाकीवरून पवन, त्यांची पत्नी मनभर, आई सुरजा आणि चार वर्षांचा मुलगा प्रवास करत होता. रुग्णवाहिकेची धडक इतकी जोरदार होती की मनभर थेट उड्डाणपुलावरून खाली पडल्या. १५ फुटांवरून कोसळल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पवन, त्यांची आई आणि चिमुकला गंभीर जखमी झाले. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र पवन यांनी उपचारांदरम्यान प्राण सोडला.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?
दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्यानंतर रुग्णवाहिका थेट उड्डाणपुलाच्या कठड्यावर चढली. या अपघाताआधी चालक सुरेंद्रनं रुग्णवाहिका एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. कोटही चौकात उभे असलेले पोलीस कर्मचारी राजन यांना रुग्णवाहिका रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरेंद्रनं रुग्णवाहिका सुसाट वेगानं पळवली. राजन यांनी रुग्णवाहिका थांबवण्याचा इशारा करूनही सुरेंद्र थांबला नाही. यानंतर राजन यांनी पुढील चौकातील पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णवाहिकेची माहिती दिली. मात्र तिथे पोहोचण्याआधीच रुग्णवाहिकेला अपघात झाला.