इंदूर : मध्य प्रदेशमधील इंदूर मधील बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात मोठी दुर्घटना घडली. रामनवमीच्या निमित्तानं मंदिरात मोठी गर्दी झाली होती. यावेळी मंदिरातील विहिरीवरील छत कोसळलं आणि दुर्घटना घडली आहे. या घटनेत २५ जण अडकल्याची प्राथमिक माहिती होती. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, या ठिकाणाहून १७ जणांना वाचवण्यात आलं असून बचावकार्य सुरु असल्याची माहिती आहे.

प्राथमिक माहितीनुसार विहीर ५० ते ६० फुट खोल असून त्यात चार ते पाच फुटं पाणी होतं. विहिरीवरील छत कोसळताच त्यावरील माणसं त्यात पडली. त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

इंदूर येथील बेलेश्वर झुलेलाल मंदिरात ही दुर्घटना घडली आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे या घटनेत आतापर्यंत ११ मृतदेह हाती लागले असून ज्यांना वाचवण्यात आलं त्यापैकी दोघांचा मृत्यू झाल्यानं या घटनेतील मृतांची संख्या १३ वर पोहोचल्याचं मिश्रा म्हणाले. या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १ एप्रिलपासून ही औषधे होणार स्वस्त, आयात शुल्क झाले माफ

इंदूरच्या बेलेश्वर झुलेलाल मंदिरात घडलेल्या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. रामनवमी असल्यानं भाविक मोठ्या संख्येनं मंदिरात दाखल झाले होते. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक असून एक मुलगी अद्याप सापडली नसल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा चौहान यांनी केली. तर, जखमींच्या उपचाराचा खर्च देखील सरकार करेल, असंही ते म्हणाले.

घराजवळ खेळत होता, फुस लावून लॉजवर नेले, थंड पेयात गुंगीचे औषध देत १७ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार

पायऱ्यांवर उभे राहिले, दोरीचा आधार

रामनवमीच्या दिवशी पटेलनगरच्या बेलेश्वर महादेव धुलेलाल मंदिरातील विहिरीवरील छत कोसळलं. या घटनेत २५ ते ३० जण खाली कोसळले. यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला. यानंतर या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये बचावलेले लोक विहिरीच्या पायऱ्यांवर उभे असल्याचं दिसून येते. लोकांना बाहेर काढण्यासाठी दोरीचा आधार घेण्यात आला. विहिरीतील पाण्यात मृतदेह आहेत की नाही याचा शोध घेण्यासाठी पाणी उपसण्याचं काम सुरु झालं आहे.

IPL 2023 चे सामने कधी, कुठे आणि किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या संपूर्ण टाइम टेबल

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रीकरणावेळी दरीत कोसळलेल्या युवकाचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here