सांगली: तासगावमध्ये द्राक्ष व्यापाऱ्याला मारहाण करत,एक कोटी दहा लाखांचा रोकड लुटण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या लुटीचा अखेर सांगली पोलिसांनी छडा लावला आहे.अवघ्या आठ तासांमध्ये पाच जणांना अटक करत त्यांच्याकडून एक कोटी नऊ लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात सांगली पोलिसांना यश आलं आहे. .

तासगावच्या दत्तमाळ येथील वसंतदादा महाविद्यालयात शेजारी असणाऱ्या गणेश कॉलनी येथे मंगळवारी द्राक्ष व्यापारी महेश केवलानी व त्यांच्या चालकाला मारहाण करत अज्ञात हल्लेखोरांनी लुटल्याचा प्रकार घडला होता.सुमारे १ कोटी १० लाखांची रक्कम लंपास करण्यात आली होती.मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता.केवलानी यांची स्कॉर्पिओ गाडी अडवून हा लुटीचा प्रकार करण्यात आला होता. केवलानी हे द्राक्ष व्यापारी असून द्राक्ष खरेदी केल्यानंतर तासगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी १ कोटी १० लाखांची रक्कम ते घेऊन आले असता,अज्ञात चोरट्यांनी गाडी अडवून मारहाण करत ही रक्कम लुटली होती.याघटनेनंतर सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तीन पथके देखील नेमली होती, आणि जिल्ह्यामध्ये नाकाबंदी देखील करण्यात आली होती.

भीषण! दुभाजक ओलांडून रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक; उड्डाणपुलावरून महिला पडली, जोडप्याचा अंत

२०२० साली सेवानिवृत्त, तरी नागरिकांसाठी नांदेडच्या वाहतूक पोलिसाची दररोज विनाशुल्क सेवा

तासगाव तालुक्यातील मनेराजुरी येथील शुक्रवार डोंगराच्या पायथ्याला काही संशयित व्यक्ती थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा मारून तिघांना ताब्यात घेतलं असता त्यांच्याकडे काही शस्त्र आणि रोकडं आढळून आली. तिघांच्याकडे अधिक चौकशी केली असता,त्यांनी सदरची रक्कम ही तासगाव शहरातल्या द्राक्ष व्यापाऱ्यांकडून लुटल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्याकडून एक कोटी नऊ लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे,अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी सांगितले आहे. नितीन यलमार,वय वर्ष २२,विकास पाटील, वय ३२ आणि अजित पाटील,वय २२ अशी तिघा संशयितांची नावे आहेत.

आयपीएलचे सामने आता Hotstar वर नाही तर नेमके कुठे पाहायला मिळू शकतात जाणून घ्या…

महेश केवलानी यांनी यानंतर माध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक बसवराज तेली आणि सांगली पोलिसांचे आभार मानले. यावेळी केवलानी भावूक झाले होते. शेतकऱ्यांचे पैसे त्यांना देण्यासाठी जाताना ही घटना घडली. पण, सांगली पोलिसांनी पैसे पुन्हा मिळवून दिल्याचं ते म्हणाले.

रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांमधला वाद चव्हाट्यावर, IPL पूर्वीच संघात ठिणगी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here