सातारा : मोबाइल फोनवर ऑनलाइन पार्टटाइम नोकरी देण्याचा मेसेज पाठवून एकाला तब्बल साडेपाच लाख रुपयांना गंडा घालण्याची घटना साताऱ्यात उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. ‘तुम्हाला टास्क पूर्ण करायचा आहे. त्यानुसार मोबदला मिळेल.’ असे फसवणूक झालेल्या पीडिताला सांगण्यात आले. हा टास्क पूर्ण केल्यानंतर काही रक्कम पीडित व्यक्तीला मिळाली सुद्धा. त्यानंतर अज्ञाताने असेच काही टास्क देऊन रक्कम भरण्यास सांगितल्याने पीडित व्यक्तीने रक्कम भरली. त्यानंतर कोणताही मोबदला मिळाला नाही. आपली फसवणूक होत असल्याचे पीडित व्यक्तीच्या नंतर लक्षात आले. नागराजू पेरूवाला असे फसवणूक झालेल्या पीडित व्यक्तीचे नाव आहे. या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मोबाइलवर ऑनलाइन पार्टटाइम नोकरीचा मेसेज पाठवून वेगवेगळ्या टास्कवर रक्कम भरून घेत एकाला साडेपाच लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधिताने सातारा शहर पोलिस ठाण्यात येत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.
घराजवळ खेळत होता, फुस लावून लॉजवर नेले, थंड पेयात गुंगीचे औषध देत १७ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार
या प्रकरणी नागराजू शंकरराव पेरुवाला (राहणार- संगमनगर, सातारा. मूळ तेलंगणा राज्याचे रहिवासी) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार दिनांक ५ ते ७ मार्च दरम्यान हा प्रकार घडला आहे. नागराजू पेरुवाला हे घरी असताना त्यांच्या मोबाइलवर दुसऱ्या मोबाइलवरुन ऑनलाइन पार्टटाइम नोकरीबाबत मेसेज आला. त्यामध्ये एक लिंक होती. ही लिंक ओपन केल्यानंतर अज्ञाताने मेसेज करून सांगितले की, तुम्हाला टास्क पूर्ण करायचा आहे. त्यानुसार मोबदला मिळेल.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १ एप्रिलपासून ही औषधे होणार स्वस्त, आयात शुल्क झाले माफ
हा टास्क पूर्ण केल्यानंतर काही रक्कम पेरुवाला यांना मिळाली. त्यानंतर अज्ञाताने असेच काही टास्क देऊन रक्कम भरण्यास सांगितले. त्याप्रमाणे पेरुवाला यांनी रक्कम भरली. परंतु, त्यानंतर कोणताही मोबदला मिळाला नाही. तसेच अज्ञाताने प्रोसेसिंग अन् टॅक्सची रक्कम भरण्यासही सांगितले. अशाप्रकारे ५ लाख ५४ हजार रुपये इतकी रक्कम भरून घेत पेरूवाला यांची फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर तपास करत आहेत.

मंडणगड दुधेरे येथील दुचाकीचा भीषण अपघात, युवकाचा दुर्देवी मृत्यू, १२ वीचे क्लास सुरू होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here