म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतूजवळील जाणाऱ्या मेट्रो मार्गाच्या ‘वायडक्ट’चे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे ३१ मार्च ते २१ एप्रिलदरम्यान या पुलावरून तारकेश्वर चौकाकडे जाणारी वाहतूक रात्री १० ते ६ वाजताच्या दरम्यान आवश्यकतेनुसार बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना या काळात पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.‘महामेट्रो’कडून वनाझ ते रामवाडी मार्गावर मेट्रोचं काम सुरू आहे. या मार्गावर सर्व कामे झाली असली, तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतूजवळील ‘वायडक्ट’चे काम अद्याप करण्यात आलेले नाही. आता मेट्रोकडून हे काम ३१ मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील २२ दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू रात्री वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

पार्टटाइम नोकरीचे आमिष, गरजूकडून घेतले साडेपाच लाख रुपये, फसवणूक झाल्याचे कळताच बसला मोठा धक्का

पर्यायी मार्ग

– पुणे स्टेशनकडून येरवड्याकडे जाणारी वाहने मोबाज चौक, मंगलदास रोडने, ब्लू डायमंड चौक, कोरेगाव पार्क जंक्शन, पर्णकुटीमार्गे जातील.
– पुणे स्टेशनकडून बोट क्लबकडे जाणारी वाहने मोबाज चौक, डावीकडे वळून ढोले पाटील रोडने जातील.
– बोट क्लब रोडने येऊन येरवड्याकडे जाणारी वाहने श्रीमान चौकातून वळून अमृतलाल मेहता रोडने कोरेगाव पार्क चौकातून जातील.
– येरवड्याकडून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांनी पर्णकुटी चौक, महात्मा गांधी चौक, कोरेगाव पार्क जंक्शन, ब्लू डायमंड चौकातून उजवीकडे वळून जावे.

कल्याणीनगर मेट्रो स्टेशनसाठी वाहतूक बदल

वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गावरील कल्याणीनगर मेट्रो स्टेशनच्या कामासाठी २८ मार्च ते २७ जूनदरम्यान ॲडलब चौकाकडे जाणारी व एन. एम. चव्हाण चौकाकडे जाणाऱ्या वाहतुकीत आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहे. त्यावेळी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here