नवी मुंबई : पनवेलमधील शिवकर गावात राहणाऱ्या तरुणावर अज्ञात मारेकऱ्यांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विनय बाबूराव पाटील (वय १९) याच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पनवेल शहर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.विनय पाटील हा बुधवारी (ता. १९) पहाटेच्या सुमारास घरात कोणालाही काही न सांगता गावालगतच्या मोर्म्युला तलावाच्या गणपती घाटाजवळ गेला होता. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याच्या बहिणीला जाग आल्यानंतर तो घरामध्ये नसल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यामुळे तिने वडिलांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी बाहेर जाऊन विनयची शोधाशोध केली.

घराजवळ खेळत होता, फुस लावून लॉजवर नेले, थंड पेयात गुंगीचे औषध देत १७ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार
काही वेळानंतर त्याचा मृतदेह मोर्म्युला तलावाच्या गणपती घाटाजवळ आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विनयची हत्या कुणी व कशासाठी केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद पवार यांनी दिली.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १ एप्रिलपासून ही औषधे होणार स्वस्त, आयात शुल्क झाले माफ
विनय पाटील यांचे परिसरातील सर्वांसोबत चांगले संबंध होते त्याची कोणासोबत दुश्मनी नव्हती अशी प्रतिक्रिया परिसरातील लोकांकडून व्यक्त केली जात आहे. त्याला घरातून एका अज्ञात व्यक्तीने पहाटेच्या अंधारात घरातून बाहेर काढत काही समजण्याच्या आतच त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या हल्ल्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

विनोद हा झाडावरून नारळ काढणे, झाडे तोडणे अशी छोटी मोठी कामे करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्यामुळे त्याच्या हत्येनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. या हत्येबाबत पोलिसांच्या तपासाकडे अवघ्या तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

काळजी घ्या! करोना येतोय, एकाच दिवसात ६९४ नवे रुग्ण, १४ दिवसांत तिपटीने रुग्णवाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here