Mumbai Water News : मुंबईकरांनो आजपासून पाणी जरा जपून वापरा. आजपासून महिनाभरासाठी १५ टक्के पाणीकपात करण्यात आले आहे. कारण…

 

water cut (1).
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! आजपासून महिनाभर १५ टक्के पाणीकपात; काय आहे कारण?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात आजपासून महिनाभर १५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होऊ लागल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असून मुंबईकरांना एक महिना पाणी जपून वापरावे लागणार आहे. मुंबई पालिकेतर्फे ठाणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही महिनाभर कपात होणार आहे.मुंबई शहर व उपनगराच्‍या एकूण पाणीपुरवठ्यापैकी सुमारे ६५ टक्‍के पाणीपुरवठा हा भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे केला जातो. या केंद्रास होणारा ७५ टक्‍के पाणीपुरवठा मुख्‍यत्‍वे ५,५०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या १५ किलोमीटर लांबीच्‍या जलबोगद्याद्वारे होतो. या जलबोगद्याला ठाणे येथे कूप‍नलिकेच्‍या खोदकामामुळे हानी पोहोचली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत आहे. पाणीगळती दुरुस्‍तीसाठी हा जलबोगदा पूर्णपणे बंद करणे व त्या काळात पर्यायी जलवाहिन्यांद्वारे भांडुप संकुल जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहचविणे आवश्‍यक आहे. त्यामुळे जलबोगदा दुरुस्‍तीच्या काळात मुंबई शहर व उपनगराचा पाणीपुरवठा बाधित होणे अटळ आहे. सध्‍या भांडुप संकुल येथे प्रक्रिया होत असलेल्‍या प्रमाणाइतके पाणी पोहोचविणे व प्रक्रिया करणे शक्‍य होणार नसल्याचे मुंबई पालिकेने म्हटले

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here