इंदूर : रामनवमीला मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भगवान शंकराच्या मंदिरातील विहिरीवरील छत कोसळून घडलेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३५ वर पोहोचला आहे. बेलेश्वर महादेव झूलेलाल मंदिरातील विहिरीवर असलेले छत कोसळून अनेक भक्त आत पडले होते. शुक्रवारी पहाटेपर्यंत ३५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर १८ भाविकांची सुटका करण्यात आली आहे. अजूनही काही जण बेपत्ता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत १८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. यापैकी दोघे जण रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी गेले आहेत. त्याच वेळी, १६ जणांवर सध्या अॅपल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर ३५ जणांचे मृतदेह एमवाय हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.

जखमींमध्ये समावेश असलेल्या मंदिराच्या पुजाऱ्याने सांगितले की, ही घटना दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. शेवटच्या प्रसादासोबतच आरतीची तयारीही सुरु होती. यादरम्यान अचानक सगळे खाली पडले. मला पोहता येतं, म्हणून कसाबसा बाहेर आलो, असं त्यांनी सांगितलं.

लेकीच्या डोक्यावर अक्षता टाकण्याआधीच वधूपित्याचा करुण अंत, ट्रकच्या धडकेत प्राण गमावले
लष्कराचे ७५ जवान बचावकार्य करत आहेत. विहिरीत ४० फूट खोलपर्यंत बचावकार्य करत आहेत. विहिरीतील पाणी गळतीमुळे मध्येच कारवाई थांबवून पाणी उपसावे लागत आहे. लष्कर, एसडीईआरएफ, एनडीईआरएफ, जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या पथकासह एकूण १४० जण बचाव कार्यात सहभागी आहेत.

अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेश मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी बोलून माहिती घेतली होती. त्यानंतर पीएमओने मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना मदत जाहीर केली होती. मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री यांनीही मदत जाहीर केली आहे.

रामनवमीनिमित्त शिर्डीत लाखो भाविकांची मांदियाळी; पहाटेच्या काकड आरतीने उत्सवाला सुरवात

गुरुवारी इंदूरच्या स्नेह नगर भागातील बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात रामनवमी उत्सवाची तयारी सुरू होती. तेवढ्यात अचानक विहिरीचे छत कोसळले. सुरुवातीला २५ जण आत पडल्याची भीती व्यक्त केली जात होती. बचावकार्यादरम्यान गोंधळ वाढत गेला. तर २५ हून अधिक जण विहिरीत पडल्याचे नंतर स्पष्ट झाले.

देवदूत असे दिसतात! रुग्णाला वाचवायला जीवाची बाजी, गरोदर डॉक्टरने स्वतः रुग्णवाहिका चालवली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here