अहमदाबादः तरुण सतत महिलेचा पाठलाग करायचा. वैतागलेल्या महहिलेने तिच्या पतीला सांगितले. दोघांनी मिळून तरुणाला घरी बोलवले अन् एक भयानक कट रचला. दोन महिन्यांपर्यंत कोणालाच थांगपत्ता लागू दिला नाही. अखेर एका चुकीमुळं पती-पत्नीने केलेल्या भयानक घटनेचा खुलासा झाला आहे. छेड काढणाऱ्या युवकाचा दोघा दाम्पत्याने खून करुन त्याचे तुकडे केल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेचा पोलिसांना आता शोध लावला आहे. पोलिस या युवकाचं शिर शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तर, कट रचणाऱ्या पती-पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.दोन महिन्यांपासून संबंधित युवक बेपत्ता होता. कुटुंबीयांनी त्याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार तरुण रिजवाना आणि इमरान यांच्या घरी जातोय असं सांगून घरातून निघाला. पोलिसांनी दोघांची चौकशी केल्यानंतर सगळं सत्य बाहेर पडलं. या दोघांनीच मिळून मेहराज पठाणची हत्या केली. मेहराज इमरानची पत्नी रिजवानाला रोज त्रास द्यायचा तसंच, त्याच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी गळ घालायचा या रागातून त्यांनी त्याचा काटा काढला.मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! आजपासून महिनाभर १५ टक्के पाणीकपात; काय आहे कारण?
मेहराज आणि इमरान दोघं मित्र होते. पण मेहराजची वाइट नजर मित्राच्या पत्नीवर होती. तो सतत तिचा पाठलाग करायचा तसंच, गेल्या एक वर्षापासून तो तिला माझ्यासोबत संबंध ठेव म्हणून मागे लागला होता. मेहराजच्या या वागणूकीमुळं वैतागलेल्या रिजवानने तिच्या पतीला एकदिवस हे सगळं सांगितलं. आपल्या मित्रांचे हे कारनामे ऐकून इमरान बिथरला. त्यानंतर त्याने आणि रिजवान दोघांनी मिळून त्याच्या हत्येचा कट रचला. रिजवानाने मेहराजला सरप्राइज देण्याच्या नावाखाली घरी बोलवलं. मेहराज जेव्हा त्यांच्या घरी गेला तेव्हा त्याला बेडरुममध्ये घेऊन गेली.

मौत का कुआ ठरली मंदिरातील विहीर! इंदूर दुर्घटनेत मृतांचा आकडा ३५ वर, पुजाऱ्याने असा वाचवला जीव
रिजवानाने मेहराजला सरप्राइजच्या नावाखाली बेडवर बसवले व त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली. त्यानंतर इमरानने बेडरुममध्ये येत तलवारीने त्याच्यावर हल्ला केला. त्याची हत्या करुन त्याच्या मृतदेहाचे तुकडे करत विल्हेवाट लावली. पती इमरान व पत्नी रिजवाना या दोघांनीही त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. अहमदाबाद क्राइम ब्रँचने या दोघांनाही तुरुंगात धाडले आहे.

सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here