परभणी: रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत पोलिसांनी डीजे लावण्यापासून रोखल्यामुळे दोन युवकांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना परभणीच्या मानवत शहरामध्ये घडली आहे. विषारी औषध प्राशन केलेल्या एका युवकाची प्रकृती चिंताजनक असून दोन्ही युवकांना मानवत येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले आहे. शुभम आप्पासाहेब दहे, शिवप्रसाद बिडवे असे आत्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकांची नावे आहेत. पोलिसांसोबत झालेल्या वादातून युवकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, रामनवमी निमित्त मानवत येथे गुरुवारी मार्चला शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून मिरवणुकीस प्रारंभ होणार होता. परंतु डीजेला परवानगी नाही असे सांगून पोलिस प्रशासनाने सिंगर बँड पथकास वाजवण्यास प्रतिबंध केला. यामुळे शोभायात्रा सहा वाजता निघाली. सिंगर बँडला प्रतिबंध केल्यामुळे जमलेल्या युवकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. यातील युवक शुभम अप्पराव दहे (वय २३) शिवप्रसाद बिडवे( वय २२) दोन्ही रा. मानवत यांनी विषारी औषध प्राशन केले. उपस्थितांनी दोन्ही युवकास उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु युवकाची परिस्थिती गंभीर असल्याने त्याना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर मिरवणुकीमधील नागरिकांची एकच धावपळ उडाली होती. संतप्त नातेवाईक मानवत पोलिस स्टेशन मध्ये दाखल झाले व ठिय्या मांडला असल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगरात राडा, खा. इम्तियाज जलील मात्र राम मंदिर वाचवण्यासाठी धावले

युवकाच्या आईचे पोलीस निरीक्षकांवर गंभीर आरोप

रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये डीजे आणला असता पोलिसांसोबत वाद झाल्यानंतर पोलीस निरीक्षक स्वामी यांनी सांगितले की, ‘तू पॉयझन घे आमचं कोणी काही वाकड करू शकत नाही. सगळं डिपार्टमेंट माझ्या हातात आहे. माझं कोणी काही वाकड करू शकत नाही’, असे शब्द पोलीस निरीक्षकांनी वापरले. जर माझ्या मुलाच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर मी पोलीस स्टेशन समोरच आत्महत्या करेन. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, असे आरोप विषारी औषध प्राशन केलेल्या शुभम दहे या युवकाची आई विजयमाला दहे यांनी केले आहेत. पोलीस अधीक्षकांकडून याप्रकरणी काय कारवाई केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

छत्रपती संभाजीनगरातील राड्यानंतर परिस्थिती नियंत्रणात, पोलिसांच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला

रामनवमीच्या मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून तरूणाची हत्या

छत्रपती संभाजीनगरध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या राड्यानंतर राज्यभरात पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यानंतरही जालन्यात रामनवमीच्या उत्सवाला गालबोट लागले. जालन्यातील बडीसडक येथे रामनवमीच्या मिरवणुकीत नाचण्याच्या किरकोळ वादातून तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली. विष्णू रामकिसन सुपारकर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

राडा घालणाऱ्यांना संध्याकाळपर्यंत अटक करणार; छ. संभाजीनगरमधील प्रकारानंतर संदीपान भुमरेंचं आश्वासन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here