नवी दिल्ली: अयोध्येतील भव्य सोन्याचे बनवण्यात यावे, अशी मागणी माजी आयपीएस अधिकारी किशोर कुणाल यांनी केली आहे. येत्या तीन वर्षांच्या काळात राम मंदिराची संरचना तयार होईल असा मला विश्वास असल्याचेही ते म्हणाले. उर्वरित वेळ हा नक्षीकामासाठी लागू शकतो. राम मंदिराच्या निर्मितीमध्ये राम भक्तांनी दिलेल्या विटांचा वापर केला जावा, अशी मागणी देखील त्यांनी केली.

मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. अयोध्येत सन ११३० मध्ये राम मंदिर होते. त्या मंदिरासाठी कसोटी दगडाचा वापर करण्यात आला होता. हे लक्षात घेता आता निर्माण होणाऱ्या मंदिरासाठी कसोटी दगडाचाच वापर व्हावा, असे केल्याने जुन्या मंदिराच्या आठवणी ताज्या होतील असे मला वाटते असे किशोर कुणाल म्हणाले. मंदिराच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. आता दोन मजल्या ऐवजी हे मंदिर तीन मजली असणार आहे. असे असले तरी देखील मंदिर निर्मितीचा कालावधी वाढणार नाही, मंदिर वेळेतच तयार होईल, असे किशोर म्हणाले.

राम मंदिराचे गर्भगृह हे सोन्याचे बनावे या किशोर कुणाल यांच्या मागणीशी राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास हे देखील सहमत आहेत. राम मंदिर निर्मितीसाठी किशोर कुणाल यांनी १० कोटी रुपये देखील दान केले आहेत. मंदिरासाठी १० कोटी रुपये दिल्याबद्दल आपण किशोर कुणाल यांना धन्यवाद देत असल्याचे महंत सत्येंद्र दास म्हणाले.

नक्की पाहा-

राम मंदिराच्या निर्मितीचा काळ जवळ आला असून त्यामुळे आपण उत्साहित आणि आनंदित असल्याचे महंत सत्येंद्र दास म्हणाले. याचे कारण म्हणजे मी गेली २७ वर्षांपासून रामलल्लाची सेवा करत आलो आहे. गेल्या २७ वर्षांमध्ये प्रभू रामाला पुष्कळ अडचणींचा सामना करावा लागला. पावसाळ्यात प्रभू रामाच्या सुरक्षा करण्यात अनेक अडचणी आल्या. गरमीमध्ये पंख्याचा वापरही करावा लागत होता, असेही सत्येंद्र दास म्हणाले.

वाचा-

अयोध्येतील राम मंदिराचे शिखर इतके उंच असावे की अयोध्येच्या कोणत्याही कोपऱ्यातून पाहिले तरी ते दिसायला हवे,असेही किशोर कुणाल म्हणाले. मग मंदिराचे शिखर हनुमानगढीपेक्षा उंच झाले तरी काही हरकत नसल्यातेही ते म्हणाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here