डीबी मार्ग पोलिसांनी चेतनला न्यायालयात हजर केले असता त्याची पोलीस कोठडी ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली होती. इन्स्पेक्टर नितीन महाडिक यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील व्हिडिओ आणि साक्षीदारांचे जबाब असे सर्व पुरावे पोलिसांकडे आहेत. चेतनला घटनास्थळी घेऊन जाण्याची गरज नाही, ते खूप धोकादायक असेल, असं पोलीस म्हणाल्याचं वृत्त ‘मिड डे’ने दिलं आहे.
“पहिल्या तीन-चार दिवसांच्या कोठडीत चेतन गाला आनंदी आणि उत्साही दिसत होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तो अस्वस्थ झाला आहे. त्याला आता त्याच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात आले आहे. त्याला एकतर फाशी होईल किंवा जन्मठेपेची शिक्षा होईल असं वाटत आहे. हे लक्षात आल्यापासून तो खूप रडत आहे.” असंही पोलिसांनी सांगितल्याची माहिती आहे.
आम्ही चेतन गालाची रोज चौकशी करत आहोत, पण तो फक्त त्याची पत्नी आणि मुलांना भेटण्याची मागणी करत आहे. तो आता त्यांचा आधार शोधत आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार
बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या प्रकाश वाघमारे यांचा पोलिसांनी जबाब नोंदवला. त्या भयंकर दिवसाच्या आठवणींनी वाघमारे शहारले. स्वतःला चाकू हल्ल्यापासून वाचवण्यासाठी उशीचा कसा वापर केला हेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, चेतन गालाची पत्नी आणि मुले सध्या एका नातेवाईकाच्या घरी राहायला गेले आहेत.