raigad crime news today marathi, जन्मदात्या बापामुळं लेकीने संपवले आयुष्य, मृत्यूपुर्वी पोलिसांना सांगितले धक्कादायक सत्य – 22 years old girl end her life due to her father
रायगडः दारुड्या बापाच्या शिवराळ भाषेला कंटाळून एका १९ वर्षीय युवतीने विष पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार महाड तालुक्यात घडला आहे. दारुड्या बापाने आपल्या मुलीला शिवीगाळ केल्यामुळे एका २२ वर्षीय तरुणीने १९ मार्च रोजी विष प्राशन केले होते. (Raigad Crime News)महाड तालुक्यात भावे चौधरी वाडी येथे हा धक्कादायक प्रकार घडला होता. दारूचे व्यसन असलेले वडील मुलीची आई व मुलगी यांना सतत शिवीगाळ करीत असत. सिद्धीका संदीप चव्हाण असे मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे. १९ मार्च रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास सिद्धीका हिला उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने तिला प्राथमिक उपचाराकरिता महाड ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले. तिची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने तिला तातडीने अधिक उपचाराकरिता मुंबई येथील जे. जे. रुग्णालय येथे पाठविण्यात आले होते. मात्र तिची प्रकृती अधिक खालावली उपचार सुरू असताना सिध्दीका हिने २२ मार्च रोजी जे. जे. रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! आजपासून महिनाभर १५ टक्के पाणीकपात; काय आहे कारण? वडील दारु पिऊन सतत शिवीगाळ करीत होते त्यामुळे त्यांच्या जाचाला कंटाळून मी उंदराचे (रेक्टोल) औषध प्यायली आहे असा सिद्धीका हिने मृत्यूपूर्वी जबाब दिला आहे. काल गुरुवारी उशिरा महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे या मृत्यूची अकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार आर. के. गोरेगावकर हे करीत आहेत.