मुंबई: रामनवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर येथे झालेली दंगल ही सरकार पुरस्कृत होती. शिंदे-फडणवीस सरकार हे काही लोकांना दंगलीसाठी प्रोत्साहन देत आहे, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. येत्या २ एप्रिलला संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा आहे. कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करून ही सभा रद्द करता यावी, यासाठी सरकारने हा सगळा कट रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यानंतर दोन्ही धर्माच्या लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे. २ एप्रिलला संभाजीनगरमध्ये मविआच्या सभेला परवानगी मिळू नये म्हणून हे सगळे कारस्थान रचण्यात आले. वातावरण तणावपूर्ण, भडका उडू शकतो, हे कारण पुढे करुन मविआच्या सभेला परवानगी नाकारली जाऊ शकते. काल मुंबईच्या मालवणी परिसरातही चकमक झाली, त्यासाठी काहीच कारण नव्हतं. यापूर्वी रामनवमीच्या मिरवणुकांवर कधीही हल्ले झाले नाहीत. गुढीपाडव्याच्या शोभायात्रांवेळीही असा प्रकार घडला नव्हता. पण उद्धव ठाकरे यांच्या सभांना खेड आणि मालेगावमध्ये मिळणारा प्रतिसाद पाहून या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे काही लोकांना हाताशी पकडून वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न होत आहेत. कारण नसताना जातीय तेढ निर्माण केली जात आहे. हा सरकारच्या नपुंसकतेचा पुरावा आहे, अशी जळजळीत टीका संजय राऊत यांनी केली.

रामनवमीच्या मिरवणुकीत नाचण्यावरुन दोघांमध्ये क्षुल्लक वाद; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात सध्या गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि कायदा-सुव्यवस्थेचं अस्तित्त्व दिसत नाही. गृहमंत्र्यांचं अस्तित्त्व हे केवळ विरोधकांवर खोटे खटले दाखल करण्यापुरते दिसते. पण लक्षात ठेवा, डाव उलटा पडला तर उद्या आम्ही सत्तेवर येऊ. तेव्हा तुम्हाला या सगळ्याची उत्तरं द्यावी लागतील. मी विशेष करुन पोलिसांना हे सांगत आहे. राज्यात सध्या कायदा सुव्यवस्था उरलेली नाही. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात रामनवमीला कधी दंगली झाल्या होत्या का? आता दंगली होता आहेत कारण तुम्ही त्यासाठी काही लोकांना स्पॉन्सर करत आहात, असे खडेबोल संजय राऊतांनी राज्य सरकारला सुनावले.

Parbhani News: रामनवमीच्या मिरवणुकीत पोलिसांनी डीजे लावण्यापासून रोखलं; संतापलेल्या दोन तरुणांनी विष प्यायलं

संभाजीनगरच्या ओहर गावात राडा

रामनवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगरमध्ये गावात दोन गटांत राडा झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता. हा तणाव निवळत नाही तोच आता ओहर गावात दोन गटांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही बाजुंनी तुफान दगडफेक करण्यात आली. यानंतर ओहर गावात पोलीस आणि सीआरपीएफचा मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

राडा घालणाऱ्यांना संध्याकाळपर्यंत अटक करणार; छ. संभाजीनगरमधील प्रकारानंतर संदीपान भुमरेंचं आश्वासन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here