चंद्रपूर : तरुण-तरुणीने एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनास्थळी विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात तरुणीचा आधी मृत्यू झाला, तर नंतर उपचारादरम्यान तरुणही दगावला. प्रेम संबंधातून दोघांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे घडली. शुभांगी भोंगळे (वय २४ वर्ष), राकेश जेणेकर (वय २७ वर्ष) अशी मृत तरुण-तरुणीची नावे आहेत. मात्र या दोघांनी टोकाचा निर्णय का घेतला? याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. प्रेम प्रकरणातून त्यांनी टोकाचा निर्णय घेतला का? या दिशेने पोलीस तपास करीत आहेत. मात्र या दोघांच्या मृत्यूने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण-तरुणीने विष प्राशन करून जीवन संपवले. वेगवेगळ्या घटनास्थळी त्यांनी विष प्राशन केले. मात्र या दोघांचे नाते समोर आले अन् सारेच हळहळले. घुग्घुस येथील रामनगर कामगार वसाहत येथील शुभांगी भोंगळे (२४) आणि गांधीनगरमधील राकेश जेणेकर (२७) असे या तरुण-तरुणीचे नाव. हे दोघे प्रेमी युगुल असल्याचे बोलले जात आहे.

अशी वेळ कुठल्याही माऊलीवर नको; बाईकवरच तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू, आईच्या कुशीत अंग टाकलं
या दोघांनी बुधवारी वेगवेगळ्या घटनास्थळी विष प्राशन केले. याची माहिती मिळताच दोघांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान शुभांगी हिचा बुधवारी मृत्यू झाला. राकेश याला अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यानेही शेवटचा श्वास घेतला.

रामनवमीला डीजे लावण्यास पोलिसांनी रोखलं; दोन युवक थेट विषारी औषध प्यायले

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास करीत आहेत. प्रेम प्रकरणातून दोघांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मात्र पोलिसांनी अद्याप ठोस कारण सांगितलेले नाही. दरम्यान घुगुस ठाणेदार यांच्याशी अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनीने संपर्क साधला असता ते म्हणाले, दोन्ही कुटुंबात दुःख पसरले आहे. त्यामुळे अद्याप कुणाचे जबाब घेतलेले नाही.

मुलांच्या ट्यूशन टिचरशी प्रेमसंबंध, पण लग्नाचं वचन मोडलं; पुण्यात तरुणीने जीवन संपवलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here