मुंबई: ‘गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा निर्णय आज परिवहन मंत्र्यांनी जो घोषित केला तो वरातीमागून घोडं आहे, ही कोकणी माणसाची फसवणूक आहे, अशी टीका भाजपा नेते आणि आमदारआशिष शेलार यांनी केली आहे.

‘ गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी परिवहन मंत्री यांनी काही नियम शिथील केले असल्याची माहिती दिली आहे. कोकणात जाण्यासाठी राज्य सरकारकडून एसटी बसेसची व्यवस्था करण्यात येणार असून आरक्षण सुरू होणार आहे. यावरुनच भाजप नेते यांनी सरकारवर टीका केली आहे. ग्रामपंचायतींनी १४ दिवस क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतल्याने गेले तीन दिवस चाकरमानी कोकणाकडे जाण्यासाठी धडपड करीत आहे. एक तर ई पास मिळत नव्हते, ज्यांना पास मिळाले त्यांच्या रांगा कशेटी घाट आणि खारेपाटण मध्ये लागल्या होत्या. अन्न, पाण्या शिवाय चाकरमान्यांचे हाल सुरु आहेत. तर आता दोन दिवस प्रवासाचे शिल्लक असताना आज शासनाने निर्णय घोषित केला.असं ते म्हणाले आहेत.

आज पासून एसटीचे बुकिंग सुरु होणार असेल तर मग कसा प्रवास होणार? १० दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला तरी ग्रामपंचायतीने १४ दिवसांचा निर्णय घेतला त्या विषयी शासनाच्या प्रतिनिधीची स्थानिकांशी चर्चा केली आहे का? रेल्वे गाड्या सोडण्यास तयार होती मग गाड्या का सोडल्या नाहीत? एसटीने जाणार त्या़ंना ई पास नाही मग खाजगी गाडीसाठी का? शासनाने १० दिवस क्वारंटाईन असे घोषित केले आणि ग्रामपंचायतीने ते मान्य न केल्यास काय करणार? आता एकाचवेळी एसटी आणि खाजगी गाड्या रस्त्यावर आल्यास वाहतूक नियोजनाचे काय? केवळ २५० रुपयात अँटीबॉडी टेस्ट होत असताना चाकरमान्यांच्या या मोफत टेस्ट शासनाने का केल्या नाही?, असे अनेक त्यांनी यावेळी उपस्थित केले आहेत. कोकणातील चाकरमान्यांची कोंडीच शासनाला करायची होती. म्हणून आता वरातीमागून घोड असल्यासारखा निर्णय घेतला आहे, अशा शब्दात आशिष शेलार सरकारवर निशाणा साधला आहे.

वाचाः

दरम्यान, यंदा गणेशोत्सवावर करोनाचे सावट आहे. त्यामुळं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मार्गात अनेक विघ्न समोर येत आहेत. ई- पास आणि क्वारंटाइनचा कालावधी यामध्ये अडकलेल्या चाकरमान्यांना या निर्णयामुळं काही अंशी दिलासा दिलासा मिळाला आहे. एसटी प्रशासनानं ३ हजार बसेची व्यवस्था चाकरमान्यांसाठी केली आहे. तसंच, एसटीने जाणाऱ्या प्रवाश्यांना कोणत्याही प्रकारच्या इ-पासची आवश्यकता भासणार नाही. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी ग्रुप बुकिंग केल्यास गावापर्यंत एसटी सोडण्याची सोयही प्रशासनानं केली आहे. यंदा मात्र, प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के एसटी चालवण्यात येणार आहेत. तसंच, कोणतेही अतिरिक्त भाडेही अकारण्यात येणार नसल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here