महेंद्रसिंग धोनी हा चेन्नई सुपर किंग्जचा कणा आहे. तो केवळ संघासाठी उत्तम कीपिंग आणि फलंदाजी करत नाही, तर त्याच्याकडे कर्णधारपदाची वेगळी क्षमता आहे. संघाला बांधून ठेवणं, वेळी योग्य निर्णय घेणं आणि मॅचविनिंग इनिंग खेळणं या आणि याहून अधिक त्याच्या खुबी आहेत त्यामुळे तो इतरांपेक्षा एक वेगळा आणि संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा खेळाडू ठरतो. अशात गुजरातविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला वगळण्यात आल्याचे वृत्त समजल्यानंतर चेन्नईच्या चाहत्यांमध्ये दुःखाची लाट पसरली. चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी याबाबत मोठे अपडेट दिले आहेत.
विश्वनाथन पीटीआयवर म्हणाले, “माझ्या माहितीनुसार, कर्णधार १०० टक्के तंदुरुस्त आहे, त्याशिवाय मला इतर कोणतीही माहिती नाही.” जर धोनी खेळू शकला नाही, तर डेव्हन कॉनवे यष्टिरक्षकाची भूमिका स्वीकारू शकतो. कॉनवे हा न्यूझीलंडचा धडाकेबाज खेळाडू आहे आणि तो त्याच्या शानदार क्रिकेट शॉट्ससाठी ओळखला जातो.
इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये चेन्नईची निराशाजनक कामगिरी झाली आणि संघ गुणतालिकेत १० व्या स्थानावर राहिला. यानंतर यंदाच्या लिलावात संघाने आपल्या संघात बेन स्टोक्ससारख्या अष्टपैलू खेळाडूचा समावेश केला आहे, जो पुढील वर्षी संघाचा कर्णधारही बनू शकतो. अशा स्थितीत चेन्नईला त्याच्याकडून यंदा विशेष कामगिरीची अपेक्षा असेल.
चेन्नई सुपर किंग्ज (CSK Squad 2023)
एमएस धोनी, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगेरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह. प्रशांत सोलंकी, महेश तीक्षना, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधू, काइल जेमिसन, अजय मंडल, भगत वर्मा, सिसांडा मगला.
सुजरात टायटन्स (Gujrat Titans Squad 2023)
हार्दिक पंड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विल्यमसन, जोशुआ लिटल.