दिल्लीः डास मारण्यासाठी कॉइल लावली मात्र त्यामुळं एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ माजली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. घरातील लोक डास मारण्यासाठी येणारी कॉइल लावून झोपले होते. त्याचवेळी कॉइलमुळं उशीला आग लागली. आग भडकल्यामुळं दोघं गंभीररित्या भाजले गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला तर, चार जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळीच एका घरातील काही लोक घरात बेशुद्ध पडले असल्याची सूचना मिळाली. त्यानंतर आम्ही लगेचच घटनास्थळी पोहोचलो. सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी आठपैकी सहा जणांना मृत घोषित केलं. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले असून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

जन्मदात्या बापामुळं लेकीने संपवले आयुष्य, मृत्यूपुर्वी पोलिसांना सांगितले धक्कादायक सत्य
मच्छरांची कॉइल लावून झोपणं आरोग्यासाठी घातक

डास मारण्यासाठी असलेल्या कॉइलमध्ये डीडीटी, अन्य कार्बन फॉस्फोरस आणि घातक रासायनिक घटक असतात. त्यामुळं बंद खोलीत डास मारण्याची अगरबत्ती वा कॉइल लावून झोपण्यामुळं आतील गॅस बाहेर पडण्यासाठी जागाच नसते. कॉइल जळत राहिल्यामुळं संपूर्ण खोलीत कार्बन मोनोक्साइड पसरतो आणि त्यामुळं ऑक्सिजनची मात्रा कमी होते. हळूहळू कार्बन मोनोक्साइड व्यक्तीच्या शरीरावर परिणाम होतो. त्यामुळं त्याला श्वास होण्यास त्रास होतो आणि गुदमरुन जीव जाण्याची शक्यता वाढते. एका संशोधनानुसार, एक कॉइल १०० सिगारेटच्याबरोबरीची आहे. यातून कमीत कमी २.५ पीएम धूर निघतो. त्यामुळं हा धूर शरीरासाठी घातक आहे.

महिलेचा पाठलाग करायचा, एकदिवस तिनेच घरी बोलवलं, बेडवर बसवून डोळ्यावर पट्टी बांधली अन्…

सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here