ठाणे : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललं प्रॉपर्टीच्या वादातून पुतण्याने दोन सख्ख्या काकांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या हल्ल्यात एका काकाचा मृत्यू झाला असून दुसरे काका गंभीर जखमी झाले आहेत.
उल्हासनगरच्या कॅम्प ३ मधील फॉलोवर लेन चौकात आज सकाळी सात वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या परिसरात राहणाऱ्या एका पुतण्याने त्याच्या दोन सख्ख्या काकांवर जीवघेणा हल्ला केला. प्रॉपर्टीच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्यात मनवीर मरोठीया यांचा मृत्यू झाला. तर रामपाल मरोठीया हे गंभीर जखमी झाले आहेत.

पुतण्याने दोघांवर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने वार केले. यातील जखमी रामपाल यांच्यावर सध्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पुतण्याचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.