नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्षाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. आज ३१ मार्च २०२३ आहे आणि पुढील काही तासात नवे आर्थिक वर्षाची सुरुवात होईल. जर तुम्ही कर बचतीसाठी गुंतवणूक केली नसेल आणि उरलेल्या काही तासात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्हाला मदत करू शकते. आज आम्ही तुम्हाला टॅक्स बचत करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे सांगणार आहोत. शेवटच्या क्षणी गुंतवणूक करण्याच्या घाईत अनेक वेळा लोक अशा चुका करतात, ज्यामुळे त्यांना नंतर पश्चात्ताप करावा लागतो. आज आपण अशाच काही चुकांबद्दल बोलणार आहोत, ज्या अनेकदा टॅक्स वाचवण्यासाठी केल्या जातात.

करदात्यांनो, आता थोडेच दिवस शिल्लक, जाणून घ्या कर बचतीच्या जबरदस्त गुंतवणूक टिप्स!
निधी विकण्याची घाई करू नका
जेव्हा-जेव्हा मोठ्या बातम्या येतात तेव्हा चित्र स्पष्ट होईपर्यंत संयम ठेवा. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. नकारात्मक बातमी ऐकून बरेच लोक घाबरतात आणि घाईघाईने आपली गुंतवणूक विकतात किंवा थांबवतात. उदाहरणार्थ, बाजारातील मोठी घसरण अनेक नवीन गुंतवणूकदारांना बाजारातून बाहेर काढण्यास भाग पाडते. निश्चितच, म्युच्युअल फंड उद्योगाने सरकारवर प्रभाव टाकून निर्णय बदलण्याची शक्यता कमी आहे. मात्र, ते मार्गदर्शक तत्त्वे बदलण्यासाठी सेबीचे मन वळवू शकतात जेणेकरून ते नवीन उत्पादने लाँच करू शकतील जे इंडेक्सेशनसह LTCG कर लाभ देऊ शकतील. त्यामुळे घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका.

चुकीची गुंतवणूक
शेवटच्या क्षणी कर बचतीसाठी गुंतवणूक करताना घाईघाईत तुम्ही चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची शक्यता जास्त असते. सारे बर्‍याच वेळा आढळून आले आहे की बर्‍याच वेळा लोक त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांना अनुरूप नसलेली योजना किंवा उत्पादने निवडतात. परिणामी त्यांना नंतर पैसे भरण्यात अडचणी येतात. म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबद्दल पूर्णपणे जाणून घेण्याचा सल्ला दिला जातो.

घर भाड्याने देणे आहे… फक्त करबचत करण्यासाठी भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी
विमा पॉलिसीद्वारे कर बचत
पूर्वीच्या काळात लोक कर बचत करण्यासाठी विमा आणि कर्ज गुंतवणूकला जुळून घ्यायचे, परंतु विम्याद्वारे गुंतवणूक करणे हा फार चांगला पर्याय नाही. PPF आणि इतर लहान बचत योजनांच्या तुलनेत तुम्हाला कमी परतावा मिळतो, त्यामुळे कर वाचवण्याच्या नावाखाली या दोन्हींची सरमिसळ करू नका.

ITR भरताना होईल ५० हजाराची बचत; कोणतीही गुंतवणूक किंवा विम्याची गरज नाही; जाणून घ्या कसे…
कर्ज घेऊन गुंतवणूक करू नका
तुम्हाला फक्त कर बचत करायची आहे म्हणून कर्ज घेऊन गुंतवणूक करू नका. कर बचत आणि तरलता गरजा यांच्यात समतोल ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, कर-बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचे क्रेडिट कार्ड वापरणे किंवा वैयक्तिक कर्ज घेणे टाळा. मात्र, कर्ज घेण्याच्या बाबतीत ते अल्प कालावधीसाठी घेतले जात असेल तरच ते निवडा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here