ओडिशाः लग्न आटपून घराकडे निघाले होते मात्र वाटेतच अपघात झाला. कार कालव्यात कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. वरपक्षाकडील ही मंडळी असल्याचं सांगण्यात येते. वराचे वाहन अंगावर पडल्याने या सात जणांचा मृत्यू झाला आहे. अजित खमारी, दिव्या लोहा, सरोज सेठ , सुमंत भोई आणि रमाकांत भोई अशी मृतांची नावे आहेत. शुक्रवारी कुटुंबीय लग्नाहून परतत असताना हा अपघात घडला आहे. गाडी चालवताना डुलकी लागल्यामुळं अपघात घडला असल्याची शक्यता आहे. शुक्रवारी पहाटे ही घटना घडली आहे.

डास मारण्याची कॉइल लावून झोपले, पण सकाळी उठलेच नाहीत, ‘ती’ एक चूक सहा जणांच्या जीवावर बेतली
वराचे कुटुंब आणि आणि नातेवाईकांना घेऊन रात्रीचे जेवण आटपून एसयुव्हीमधून घरी परतत होते. त्याचवेळी परमनपुर गावाजवळ हा अपघात पडला व गाडी कालव्यात कोसळली. गाडी कालव्यात कोसळल्यामुळं सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शवविच्छेदन केल्यानंतर कुटुंबीयांकडे मृतदेह सोपवण्यात आले आहेत.

जन्मदात्या बापामुळं लेकीने संपवले आयुष्य, मृत्यूपुर्वी पोलिसांना सांगितले धक्कादायक सत्य

सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here