नाणेफेक जिंकल्यानंतर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु केवळ सलामीवीर पथुम निसांका (५७), कर्णधार दासुन शनाका (३१) आणि चमिका करुणारत्ने (२४) यांनी उल्लेखनीय योगदान दिले. तर मॅट हेन्री, हेन्री शिपले आणि डॅरिल मिशेल यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतले.
भारत आणि इतर सहा संघांनी ऑक्टोबरमध्ये सुरू होणार्या विश्वचषक स्पर्धेत आधीच आपली जागा निश्चित केली आहे, सुपर लीग क्रमवारीत वेस्ट इंडिजने आपले आधीच स्थान निश्चित केले आहे. दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड हेही या स्पर्धेत आपली जागा मिळवण्यासाठी ओळीत आहेत. श्रीलंका आता जून आणि जुलैमध्ये झिम्बाब्वेमध्ये १० संघांच्या पात्रता स्पर्धेत भाग घेणार आहे.
न्यूझीलंडने मागील कसोटी मालिका देखील २-० ने जिंकून श्रीलंकेची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचं स्वप्न तोडलं. आता न्यूझीलंड आणि श्रीलंका ऑकलंडमध्ये रविवारपासून सुरू होणाऱ्या तीन टी-२० मालिकेत आमनेसामने येणार आहे.
एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये एकूण १० संघ खेळणार आहेत आणि आतापर्यंत ७ संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. विश्वचषक २०२३ सुपर लीग अंतर्गत, पॉइंट टेबलमधील सर्व शीर्ष ८ संघांना पात्र होण्याची संधी मिळणार होती. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या या चक्रानंतर श्रीलंका संघाने गुणतालिकेत ९ वे स्थान मिळवले.
त्यामुळे श्रीलंकेचा संघ थेट पात्र ठरला नाही, परंतु जून २०२३ मध्ये खेळल्या जाणाऱ्या पात्रता फेरीतून या संघाला पुन्हा स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची संधी मिळेल. त्याचवेळी आता शेवटच्या स्थानासाठी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत आहे. वेस्ट इंडिज संघाने आपले सर्व सामने खेळले आहेत, मात्र दक्षिण आफ्रिकेचे दोन सामने बाकी आहेत.