लोढा ग्रुपकडून खरेदी
गर्भनिरोधक उत्पादन निर्माता फॅमी केअरचे संस्थापक जेपी तापरिया यांच्या कुटुंबाने दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरात हे अलिशान ट्रिपलेक्स अपार्टमेंट विकत घेतले आहे. तापरिया कुटुंबाने हे अपार्टमेंट लोढा ग्रुपकडून खरेदी केले होते. हे अपार्टमेंट सुपर लक्झरी रेसिडेन्शिअल टॉवर लोढा मलबारच्या २६व्या, २७ व्या आणि २८व्या मजल्यावर आहे. हा टॉवर वाळकेश्वर रोडवर गव्हर्नर इस्टेटच्या समोर आहे. याच्या एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला हँगिंग गार्डन्स आहेत.
प्रति स्क्वेअर फूट इतका भाव
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपार्टमेंटचे एकूण क्षेत्रफळ २७,१६० स्क्वेअर फूट असून हा करार १.३६ लाख रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने करण्यात आला आहे. प्रति चौरस फूट आधारावर हा देशातील सर्वात महाग निवासी करार आहे. बजाज ऑटोचे चेअरमन निरज बजाज यांनी अलीकडेच याच टॉवरमध्ये २५२.५० कोटी रुपयांना एक पेंटहाऊस विकत घेतले आहे. तापरिया कुटुंबाने लोढा समूहाची सूचीबद्ध कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर्सकडून अपार्टमेंट खरेदी केले. त्याची नोंदणी बुधवारी सायंकाळी झाली. टपरिया कुटुंबाने १९.०७ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले. हा लक्झरी टॉवर १.०८ एकरमध्ये पसरलेला असून त्याचे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सर्वात महाग सौदा
फेब्रुवारीमध्ये वेलस्पन ग्रुपचे चेअरमन बीके गोयंका यांनी मुंबईतील वरळी भागात २४० कोटी रुपयांना एक पेंटहाऊस खरेदी केले होते. त्यावेळी हा सर्वात महागडा निवासी करार होता. पण नीरज बजाज यांनी यापेक्षा महाग घर विकत घेतले. आता तापरिया कुटुंबाने देशातील आतापर्यंतचा सर्वात महागडा निवासी सौदा केला आहे. गेल्या आठवड्यात सिंथेटिक फायबर रोप मेकर टफ्रोप्सचे संचालक माधव अरुण गोयल यांनीही याच प्रकल्पात १२१ कोटी रुपयांचे सुपर लक्झरी अपार्टमेंट विकत घेतले. मलबार हिल आणि वाळकेश्वर रोड हे देशातील सर्वात महागडे ठिकाण आहेत. येथील मालमत्तेला जास्त मागणी आहे.