मुंबई : आपलं स्वतःच घर घेणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यापासून कर्ज महाग झाले आहे आणि रिअल इस्टेट बाजारात ज्या पद्धतीने घरांच्या किमती वाढत आहेत, एखाद्या व्यक्तीसाठी घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करणे आता इतके सोपे राहिले नाही. प्रत्येकासाठी हा आता एक मोठा आर्थिक निर्णय बनला आहे. वेळेआधीच घर विकत घेतले किंवा उशीर घर घ्या, दोन्ही बाबतीत खरेदीदारांना पश्चाताप होतो. तुम्हालाही या सर्वांचा सामना करावा लागणार नाही, यासाठी वैयक्तिक वित्तविषयक (पर्सनल फायनान्स) मूलभूत नियम आत्मसात करणे आवश्यक आहे.…जेणेकरून आपल्या स्वप्नांचा बळी द्यावा लागणार नाही
गृहखरेदीसाठी आज तुमच्याकडे मोठी रक्कम असली पाहिजे, त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी एकरकी रक्कम असणे संभव नाही. अशा स्थितीत ग्राहकांना बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज काढावे लागते. गृहकर्ज हे दीर्घ मुदतीचे कर्ज असते आणि त्याचा EMI देखील वाजवी असतो. जर तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा अनेक वर्षांपासून कर्जाचं हफ्ता भरण्यास देत असाल तर ठीक आहे, पण तुमची तयारी चुकली तर तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय तुम्हाला महागात पडू शकतो.

अशा स्थितीत तुमचं एक स्वप्न तुमच्या कुटुंबाच्या अनेक स्वप्नांची बळी घेईल. अशा स्थितीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तुमचा खिसा कसा तपासायचा ते खाली दिलेल्या एका सूत्रानुसार समजून घ्या.
बापरे! मुंबईत ३६९ कोटींना प्राॅपर्टी खरेदीचा सौदा, खरेदीदार कोण? जाणून घ्या
५०:३०:२० नियम काय सांगतो?
हा पर्सनल फायनान्सचा थंब रूल आहे. ५०३०२० म्हणजे तुम्ही तुमच्या हातातील पगारातील ५०% आवश्यक गोष्टींवर खर्च करा. यामध्ये नियमित बिलं, भाडे, ईएमआय, किराणा खरेदी यासारख्या खर्चांचा समावेश आहे. त्यानंतर पगारातील २० टक्के रकमेची गुंतवणूक करावी. आणि आता शिल्लक ३० टक्के इतर अनावश्यक खर्चासाठी वापरा. कोणतेही कर्ज घेताना लक्षात ठेवा की तुमची एकूण EMI तुमच्या पगाराच्या ३०% पेक्षा जास्त नसावी, अन्यथा तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता.

घर खरेदीचा हिशेब समजून घ्या..
समजा की तुमचे मासिक उत्पन्न १ लाख रुपये आहे तर यातील आवश्यक खर्चासाठी तुम्हाला ५० हजार रुपये लागतील. तर उरलेल्या ५० हजार रुपयांसह तुम्हाला घराचा ईएमआय भरावा लागेल. अशा स्थितीत तुमचा पगार १ लाख रुपये असल्यास ५०३०२० सुत्रानुसार तुमच्या गृहकर्जाच्या ईएमआय ३०,००० रुपयांपेक्षा जास्त नसावा.

महागड्या EMI ने उडवली झोप?, ३० लाखांच्या कर्जावर ४ लाखांची होईल बचत, पाहा कसं
२० हजार रुपयांची तुम्ही कुठेतरी गुंतवणूक कराल तर उर्वरित ३० हजार रुपये इतर खर्चासाठी ठेवाल. आता जर तुम्ही सुमारे ३० हजार रुपये EMI भरत असाल तर तुमचे गृहकर्ज २० वर्षांसाठी ३५ लाख रुपये, २५ वर्षांसाठी ३८ लाख रुपये आणि ३० वर्षांसाठी ४० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

अन्य खर्चाचेही व्यवस्थापन करा

आजच्या काळात घर खरेदीसाठी गृहकर्जाची प्रत्येकाला गरज पडते. घराच्या किंमतीच्या किमतीच्या ८०-९०% कर्ज तुम्हाला बँकेकडून मिळेल. तर उरलेल्या रकमेची व्यवस्था स्वतःच करावी लागेल. जर तुम्ही ५० लाख रुपयांचे घर खरेदी करत असाल तर तुमच्याकडे डाउन पेमेंटसाठी १० लाख रुपये असणे आवश्यक आहे. एक लाख रुपयांच्या उत्पन्नानुसार ४० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेणे योग्य ठरेल.

जास्त कर्ज घेतल्यास तुमचा EMI वाढेल आणि इतर खर्च कमी होतील. त्यामुळे तुम्ही जितकी जास्त डाउन पेमेंट कराल तितकं तुमच्या कर्जाचा EMI कमी होईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क यांसारखे घर खरेदी करताना इतर खर्चाचा समावेश असतो आणि यासाठी वैयक्तिक कर्ज घेणे टाळा. वैयक्तिक कर्ज घेऊन हे काम केल्याने तुमच्यावर दुप्पट ईएमआयचा भार पडेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here