मुंबईः महाराष्ट्रात करोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येनं उच्चांक गाठला आहे. गेल्या २४ तासांत १२ हजार ३२६ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यात २ लाख ९९ हजार ३५६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान राज्यात आज १ लाख ४२ हजार १५१ अॅक्टिव्ह रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. ()

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण बरे होण्याची संख्या १० हजारांवर पोहचली आहे. त्यामुळं राज्य करोनामुक्त होण्याच्या दिशेनं हे पहिलं पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे. राज्यात आज १२ हजार ३२६ नवीन रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) एक टक्क्यानं वाढून ६५. ३७ टक्के इतका झाला आहे. तर, आत्तापर्यंत एकूण २ लाख ९९ हजार ३५६ रुग्ण करोनावर मात करुन सुखरुप घरी परतले आहे. लवकरच ही संख्या ३ लाखांच्या घरात पोहोचणार आहे. दरम्यान, आज तपासण्यात आलेल्या २३ लाख ५२ हजार ०४६ चाचण्यांपैकी ४ लाख ५७ हजार ९५६ चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून बाकी निगेटिव्ह आहेत.

वाचाः

गेल्या २४ तासांत ७ हजार ७६० नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. तर आज ३०० जणांनी करोनामुळं आपले प्राण गमावले आहे. त्यामुळं एकूण करोनाबाधित मृतांची संख्या १६ हजार १४२ वर पोहोचली आहे. त्यामुळं राज्यातील मृत्यूदर ३. ५२ टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ९ लाख ४४ हजार ४४२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ४२ हजार ९०५ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here