लखनऊ: उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये मुलानं आई वडिलांची कात्रीनं भोसकून हत्या केली आहे. मुलगा कुटुंबासोबत एका भाड्याच्या घरात राहत होता. आई, वडील खोलीत झोपले असताना मुलगा त्यांच्या घरात गेला. त्यांना खोली आतून लॉक केली आणि आई, वडिलांना भोसकलं. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यात ३८ सेकंदांत ४७ वेळा मुलगा वडिलांना कात्रीनं भोसकताना दिसत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.क्वार्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या झाकिर नगरातील गल्ली नंबर ७ मध्ये ही घटना घडली. गुलाम मुहीउद्दीन असं आरोपीचं नाव असून तो अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. गुलाम त्याचे आई, वडील आणि तीन भावंडांसह गेल्या ५ महिन्यांपासून मोहम्मद सलीम यांच्या घरात भाड्यानं राहत होता. बुधवार-गुरुवारच्या रात्री गुलामचे आई, वडील एका खोलीत झोपले होते. दुसऱ्या खोलीत त्याच्या दोन बहिणी आणि एक भाऊ झोपला होता. रात्री ३ वाजता गुलाम मुहीउद्दीनं इस्त्री आणि कात्री घेऊन आई, वडिलांच्या खोलीत गेला. त्यानंतर त्यानं आतून कडी लावून घेतली.
हृदयद्रावक! रामनवमीच्या मिरवणुकीत अनर्थ; तीन तरुणांचा जीव गेला; जल्लोषाच्या जागी आक्रोश
दार आतून लावून घेतल्यानंतर गुलामनं आई वडिलांवर हल्ला सुरू केला. त्यांचा आक्रोश ऐकून कुटुंबातील इतर सदस्य उठले. त्यांनी खोलीत जाण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे कोणीच आत जाऊ शकलं नाही. गुलामनं आधी त्याच्या आईचा जीव घेतला. त्यानंतर वडिलांवर कात्रीनं वार करण्यास सुरुवात केली.
स्मशानात रोज रात्री प्रेतयात्रा यायच्या, चिता पेटायच्या; संशयावरून पोलिसांचा छापा अन् मग…
या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ ३८ सेकंदांचा आहे. त्यात गुलाम त्याच्या वडिलांची हत्या करताना दिसत आहे. त्यानं ४७ वेळा वडिलांच्या मान, छाती आणि पोटावर वार केले. तो अधूनमधून वडिलांच्या पोटावर हात ठेवून त्यांचा श्वास सुरू आहे की नाही ते पाहायचा. त्यानंतर पुन्हा कात्रीनं भोसकण्यास सुरुवात करायचा. खोलीबाहेर जमलेल्या लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्याच्या भावंडांनीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र गुलामनं कोणाचच ऐकलं नाही.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

शेजाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळ गाठलं. तेव्हा गुलाम आई, वडिलांच्या मृतदेहाजवळ बसला होता. त्याचे हात रक्तानं माखलेले होते. हातात कैची होती. पोलिसांनी महत्प्रयासानं दार उघडलं आणि आरोपीला अटक केली. त्याच्याकडे असलेली कैची आणि इस्त्री हस्तगत करण्यात आली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here