State Governments Decision : प्रस्तावित दरवाढीला राज्य सरकारने मान्यता दिल्यास शहरातील घरांच्या किमती वाढणार होत्या. मात्र आता राज्य सरकारने दरवाढ न करण्याचा निर्णय घेत

 

house price
रेडी रेकनर दर
मुंबई : राज्य सरकारने बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा देत आगामी आर्थिक वर्षात रेडी रेकनरचे आधीचेच दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घरांच्या किंमती वाढण्याची जी भीती व्यक्त केली जात होती, ती तूर्तास टळली आहे. मुद्रांक विभागाकडून पुणे शहरात ‘रेडी रेकनर’च्या दरात सरासरी ८ ते १५ टक्के, पिंपरी-चिंचवड शहरात १० ते १५ टक्के, तर ग्रामीण भागात पाच ते सात टक्के दरवाढ प्रस्तावित करण्यात आली होती. प्रस्तावित दरवाढीला राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्यास शहरातील घरांच्या किमती वाढणार होत्या. मात्र आता राज्य सरकारने दरवाढ न करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतही मागील वर्षभर घरांची विक्री दमदार झाली होती. त्याआधारेच यंदा रेडी रेकनर दर १० ते १४ टक्के वाढतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र अशी दरवाढ करणं सरकारने टाळलं आहे.

रेडी रेकनर दराचा कसा होतो परिणाम?

जमीन, भूखंड, निवासी घर, व्यावसायिक जागा यांचे रेडी रेकनर दर १ एप्रिलपासून लागू होत असतात. नगररचना (मूल्यांकन) या विभागाकडून हे दर ठरवले जातात. हे दर मुद्रांक शुल्क आकारणीसाठी ग्राह्य धरले जातात. घर खरेदी खतावरील (सेल डीड) प्रत्यक्ष किंमत आणि रेडी रेकनर, यापैकी जे अधिक असेल त्या दराने मुद्रांक शुल्क आकारले जाते. याअंतर्गत २०२० ते २०२२ दरम्यान करोना संकटामुळे दरात माफक वाढ झाली होती. त्यामुळे यंदा मोठी दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here