अकोला: जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील माना येथे खोदकामात प्राचीन तीन दुर्मिळ मूर्ती सापडली आहे. रामेश्वर इंगोले यांच्या घराच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना मूर्ती सापडल्या. जैन धर्माचे बाविसावे तीर्थंकर नेमीनाथ म्हणजेच अरिष्टनेमी यांच्यासह आणखी दोन मूर्ती सापडल्या आहेत. या मूर्तींचं विधीवत पूजन करण्यात आलं असून या मूर्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुर तालुक्यातील माना हे गाव जवळपास २० हजार लोकसंख्येचं आहे. माना हे गाव पुरातन काळात मणिपूर या नावानं ओळखलं जायचं. आज (३१ मार्च) माना गावात जेसीबीनं खोदकाम सुरू केलं आणि काही तासांत पाच फूट जमिनीत दगडाच्या मूर्ती सापडल्या. जैन धर्माचे बाविसावे तीर्थंकर नेमीनाथ यांची ही मूर्ती असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राम मंदिरात ठेवण्यात आली आहे. यासंदर्भात पुरातन विभागाला कळवण्यात आल्याची माहिती माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास भगत यांनी दिली आहे. सापडलेल्या मूर्ती तब्बल ३ हजार वर्षांपूर्वीची असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
लग्नानंतर ३ महिन्यांनी माहेरी गेलेल्या तरुणीनं आयुष्य संपवलं; विरहात पतीचं टोकाचं पाऊल
माना गाव पुरातनकाळी मणिपूर नावानं ओळखलं जायचं. या गावावर बब्रुवानाचं राज्य होतं. बब्रुवानानं युद्ध केल्यानंतर संपूर्ण गाव पलटी केलं होतं, अशा पुरातन काळातील दंतकथा आहेत. तेव्हापासून मानागावात सापडलेल्या स्थितीत उलट्या स्थितीत सापडल्या आहेत. १४ मार्च १९८६ रोजी माना येथील याच जागेवर खोदकाम करताना जैन धर्माच्या मूर्ती सापडल्या होत्या. त्या मूर्ती आजही नागपूरातील संग्रहालयामध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
अनोळखी तरुणीचा VIDEO कॉल, पुणेकर आजोबांशी गुलूगुलू बोलली; कपडे काढायला लावले अन् मग…
माना येथील रमेश इंगोले यांच्या आजोबांनी आपल्या नातवाला आपल्या घराच्या खाली प्राचीन मूर्ती दबून असल्याचं एकेकाळी सांगितलं होतं. नातवाने ही चर्चा आपल्या मित्रांसोबत केली. त्यानंतर याचा सुगावा जैन समाजाच्या लोकांना लागला. मग जैन समाजातील लोक हे मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांच्यापर्यंत पोहोचले. सर्व हकीकत आमदारांसमोर ठेवली. आमदारांनी पोलीस यंत्रणेसह माना इथे जेसीबीनं खोदकाम सुरू केले. खोदकामात दगडाची ३ मूर्ती सापडली. जैन धर्माचे बाविसावे तीर्थंकर नेमीनाथ म्हणजेच अरिष्टनेमी यांच्यासह अन्य दोन मूर्ती सापडली आहे. अजूनही या ठिकाणी खोदकाम सुरू आहे.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

मूर्तिजापूर येथील आमदार हरीश पिंपळे यांनी ज्या ठिकाणी ३ मूर्ती आढळून आल्या, तिथे जैन मंदिर बांधून देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच या जागेवर जी घरं आहेत, त्यांचं पुनर्वसन करून त्यांना इतर ठिकाणी घरं बांधून देण्याचा शब्दही दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here