A school boy died, खेळता खेळता शाळेच्या संरक्षक भिंतीला धक्का लागला, भिंत अंगावर कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू – in jalgaon a school boy has unfortunately died after the protective wall of the school collapsed on him
जळगाव : जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ खेळत असतांना संरक्षक भिंत अंगावर कोसळल्याने १३ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मोहित योगेश नारखेडे (वय-१३ वर्षे, राहणार- वरची आळी नशिराबाद, तालुका- जळगाव) असे मयत मुलाचे नाव आहे. संबंधित शाळा प्रशासन आणि बांधकाम करणारा ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मयत मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. सायंकाळपर्यंत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. नशिराबाद गावातील वरची आळी भागात मोहित हा त्याच्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होता. मोहित हा सातवीच्या वर्गात शिकत होता. सध्या परीक्षेच्या नंतर सुट्ट्या असल्याकारणामुळे तो घरी होता. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास तो मित्रांसोबत घरापासून पाचशे मीटरच्या अंतरावर असलेल्या सनसवाडी रोडवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ खेळत होता. खेळता खेळता भिंतीला धक्का लागला असता, अचानक शाळेची संरक्षक भिंत त्याच्या अंगावर कोसळली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालविली. मुलाच्या मृत्यू झाल्याचे पाहून त्याच्या आई-वडिलांनी जिल्हा रुग्णालयात मोठा आक्रोश केला. साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी कारवाई; तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना दापोली पोलिसांकडून अटक कुटुंबीयांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
गेल्या सात महिन्यापूर्वी या शाळेच्या संरक्षक भिंतींचे काम करण्यात आले आहे. काही कारणास्तव ते काम अपूर्ण राहिले आहे, ते काम पूर्ण न झाल्याने तसेच ठेकेदाराने भिंतीचे काम हे चांगल्या दर्जाचे केलेले नसल्यामुळे ती आज अचाकन कोसळली. यामुळे निष्पाप मुलाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मयत मोहितचे वडील योगेश अशोक नारखेडे यांनी केला आहे. तसेच संबंधित ठेकेदार तसेच जिल्हा परिषद शाळा प्रशासनावर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, जोपर्यंत कारवाई होवून गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्राही मयत मोहित याचे कुटुंबीय तसेच नातेवाईकांनी घेतला आहे. कुठलीही कारवाई न झाल्यामुळे सायंकाळी मोहित याचा मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात घेतला नाही.
मयत मोहित याच्या पश्चात मोठा भाऊ केतन, आई निर्मलाबाई, वडील योगेश नारखेडे असा परिवार आहे. मोहित याचे वडील योगेश नारखेडे हे नशिराबाद येथील ओरिएंट कंपनीच्या सिमेंट फॅक्टरीमध्ये ट्रॅक्टर चालक म्हणून नोकरीला आहेत. दरम्यान दुर्देवी घटनेत मुलाच्या मृत्यूमूळे नशीराबाद गाव सुन्न झाले आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य लालचंद पाटील यांनीही जिल्हा रुग्णालयात मयताच्या कुटुंबीयांची भेट घेत सात्वंन केलं. तसेच याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.