सोलापूर : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेससाठी सात वेळा प्रतिनिधित्व केलेले माजी खासदार संदिपान थोरात यांचं निधन झालंय. ते ९० वर्षांचे होते. सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

संदिपान थोरात हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जात. त्यांचे गांधी कुटुंबाशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. याचबरोबर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात. संदिपान थोरात यांनी पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे सलग सात वेळा प्रतिनिधित्व केले ते १९७७, १९८०, १९८४, १९८९ , १९९१ , १९९६ आणि १९९८ असे सलग सात वेळा पंढरपूर मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले होते.

संदिपान थोरात हे मुळचे माढा तालुक्यातील निमगाव येथील होते. त्यांनी माढा येथे जगदंबा सुतगिरणीची स्थापना केली होती. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली, पत्नी असा परिवार आहे. संदिपान थोरात हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. मध्यंतरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.

संयोगिताराजेंना मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास विरोध, आव्हाड संतापले, म्हणाले, सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा!
जनता पक्षाची लाट असतानाही संदीपान थोरात निवडून आले होते

सामान्य मातंग समाजातून आलेले आणि गांधी घराण्यावर एकनिष्ठ म्हणून ओळखले गेलेले संदीपान थोरात हे प्रतिष्ठित वकील होते. थोरात यांचे मूळ गाव माढा तालुक्यातील निमगाव होते. तरूणपणीच काँग्रेसच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय झाले. १९७७ साली काँग्रेसच्या पडत्या काळात संदीपान थोरात यांना पंढरपूरच्या तत्कालीन लोकसभा राखीव मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. तेव्हा देशभर जनता पक्षाची लाट असतानाही थोरात हे निवडून आले होते. त्यानंतर सलग सातवेळा थोरात यांनी पंढरपूर मतदारसंघातून लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते. माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्यावर त्यांची अढळ निष्ठा होती.

थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय… २९ उमेदवार अपात्र केल्यावर बंटी पाटील इरेला पेटले!
आठवलेंनी पंढरपूरमधून पाडल्यानंतर थोरात राजकारणापासून अलिप्त राहिले

१९९९ साली काँग्रेसमध्ये फूट पडली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केल्यानंतर त्याचवर्षी लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. त्याकाळी पंढरपूरमध्ये काँग्रेसने पुन्हा आठव्यांदा संदीपान थोरात यांना उमेदवारी दिली होती. परंतु त्यावेळी राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले रिपाइं नेते रामदास आठवले यांच्याकडून थोरात यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर मात्र संदीपान थोरात राजकारणापासून दूर राहिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here