नागपूर : निवडणूक शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपवल्याच्या प्रकरणात आरोपी असलेले भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे उपस्थित राहावे लागू शकते. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात दोन गुन्ह्याची माहिती लपवली, असा आरोप ईडी प्रकरणातील आरोपी अॅड. सतीश उके यांनी केला आहे. या प्रकरणात फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार त्यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे केली आहे. या तक्रारीवरील सुनावणी दरम्यान शुक्रवारी उके यांच्या बाजूने उक्तीवादाची तसेच साक्षी पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपीला न्यायालयात म्हणणं मांडण्यासाठी उपस्थित राहावे लागते. त्यानुसार, देवेंद्र फडणवीस यांना १५ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीस उपस्थित राहावे लागू शकते. ते कामात व्यस्त असल्यास त्यांचे वकील बाजू मांडू शकतात, असेही सांगितलं जाते. अॅड. उदय डबले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे बाजू मांडली.

तो सनातन धर्म आम्हाला मान्य नाही, खुलेआम सांगावे लागेल, संयोगिताराजेंच्या समर्थनार्थ जितेंद्र आव्हाडांची खमकी पोस्ट

नेमकं काय आहे प्रकरण?

देवेंद्र फडणवीस यांच्यावर १९९६ आणि १९९८ मध्ये दोन गुन्हे दाखल असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणात त्यांनी न्यायालयातून जामीन घेतला होता. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दावा अर्ज भरताना त्यांनी या दोन प्रकरणांची माहिती दिली नाही. उके यांनी या विषयावर जेएमएफसी न्यायालयात याचिका दाखल करून फडणवीस यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here