नवी दिल्ली: राम मंदिराबाबतच्या (Ram Mandir) काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवरून ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआएम) नेते () यांनी काँग्रेस पक्षावर (Congress) निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्या यांनी केलेल्या वक्तव्यावरून ओवेसी यांनी निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच शांत राहून हिंदुत्वाचे (Hindutva) राजकारण करत आला आहे. त्या पेक्षा आपण हिंदुत्वाची विचारधारा मानतो हे काँग्रेसने खुलेपणाने सांगावे. काँग्रेस पूर्वी देखील मिळालेला होता आणि आताही मिळालेलाच आहे, अशा शब्दांत ओवेसी यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. (Asduddin Owaisi says the congress party has been silently )

ओवेसी यांनी ही प्रतिक्रिया प्रियांका गांधी यांच्या वक्तव्यावर दिली आहे. प्रभू राम सर्वांचेच आहेत. राम हे सर्वांसोबत आहेत. साधेपणा, साहस, संयम, त्याग, वचनबद्धता, दीनबंधु हे रामनामाचे सार आहे, असे काँग्रेस नेते प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. रामलल्लाच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय एकता, बंधुत्व आणि सांस्कृतिक समरसतेची संधी असल्याचेही त्या म्हणाल्या. त्यावर ओवेसी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कट्टर हिंदुत्वाची विचारधारेचा स्वीकार करणे ही चांगली गोष्ट आहे, असा टोला त्यांनी प्रियांका गांधी यांना लगावला आहे. आज तक या वृत्तवाहिनीवर आयोजित धर्मसंसद या कार्यक्रमात ते बोलत होते.

आता काँग्रेस पक्ष नाटक करत नसल्याचे पाहून आपल्याला बरे वाटत आहे. तुम्हाला कट्टर हिंदुत्वाच्या विचारधारेचा स्वीकार करायचा असेल तर ठीक आहे, मात्र बंधुभावाच्या मुद्द्यावर त्यांनी पोकळ चर्चा तरी करू नये, असे ओवेसी म्हणाले.

वाचा:
राम मंदिराशी संबंधित कार्यक्रमाचे समर्थन करत अशा प्रकारची प्रतिक्रिया गांधी-नेहरू कुटुंबातील नेत्याने पहिल्यांदाच दिल्याने ही प्रतिक्रिया महत्वाची मानली जात आहे. प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रिय असून त्याचे हे वक्तव्य म्हणजे काँग्रेसच्या रणनीतीत बदल झाला असल्याचे संकेत देत असल्याचे मानले जात आहे.

नक्की पाहा-
राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून विविध प्रकारती वक्तव्ये आलेली आहेत. अशात प्रियांका गांधींची ही प्रतिक्रिया आली आहे. या पुढे प्रियांका गांधी यांच्या प्रतिक्रियेला पुरक असलेलीच प्रतिक्रिया आता काँग्रेस नेत्यांकडून येतील असे म्हटले जात आहे.

ही बातमी वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here