नागपूर: रामजन्मोत्सव मिरवणूक पाहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये किरकोळ भांडणावरुन ठिणगी पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. भांडणानंतर एक महिला जिन्यावरून खाली पडून गंभीर जखमी झाली, त्यानंतर तिचा मृत्यू झाला. उपाचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही दोन्ही कुटुंबे सीताबर्डी मेट्रो स्टेशनजवळील फॉर्च्युन मॉलच्या पायऱ्यांवर बसून शोभायात्रा पाहत होती. या घटनेची माहिती मिळताच धंतोली पोलिसांनी एका पुरुषासह तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रामनवमीनिमित्त शहरात भव्य मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत उपस्थित असलेल्या आकर्षक देखावे पाहण्यासाठी लहान मुलांपासून सर्व वर्गातील लोक पोहोचतात. त्यामुळे रात्री बर्डी परिसरात मोठी गर्दी असते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोषी बिनकर असे मृत महिलेचे नाव असून ती मानेवाडा रोड न्यू बालाजी नगर येथील रहिवासी आहे. जी मेडिकल हॉस्पिटलमध्ये हेड नर्स म्हणून काम करत होती. गुरुवारी रात्री संतोषी तिच्या संपूर्ण कुटुंबासह रामनगरला शोभायात्रा पाहण्यासाठी गेली होती. त्यानंतर संपूर्ण कुटुंब सीताबर्डी येथील फॉर्च्युन मॉलमध्ये पोहोचले आणि मॉलच्या पायर्‍यांवर बसून ते शोभायात्रा पाहू लागले.

सर्वसामान्यांच्या खिशाला झळ; टाटा, बेस्टची वीज महागली, आजपासून असे असतील नवे दर
दरम्यान, मॉलच्या पायऱ्यांवर दुसरे कुटुंबही बसले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास पायऱ्यांवर बसलेल्या एका पुरुषाच्या पायाने महिलेला धक्का लागला. त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला. दोन्ही कुटुंबातील वाद टोकाला गेला. या भांडणात अचानक संतोषीला धक्का बसला आणि ती मॉलच्या पायऱ्यांवरून खाली पडून गंभीर जखमी झाली. त्यानंतर त्यांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच धंतोली पोलिसांनी मॉलमध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यात एक पुरुष आणि तीन महिलांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करोना आणि इन्फ्लुएन्झाची लक्षणे संमिश्र, रुग्ण ओळखणार कसा?; डॉक्टरांनी शोधला उपाय

रामनवमीच्या मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन बेभान होऊन नाचले, भले भले डान्सरही फिके पडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here