GST on Sugarcane Juice : उन्हाळ्यात सर्वांच्या आवडीचं पेय म्हणजे ऊसाचा रस (Sugarcane juice). मात्र, आता याच ऊसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी (GST) भरावा लागणार आहे. उत्तर प्रदेशात जीएसटी अ‍ॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने (authority for advance ruling uttar pradesh) याबाबतचा निर्णय दिला आहे. त्यामुळं आता ऊसाचा महाग होणार आहे. मात्र, तुम्ही जर रस्त्यावरील गाड्यावर किंवा ऊस स्टॉलवर रस घेतला तर त्यासाठी हा GST द्यावा लागणार नाही.

ऊसाचा रस हा कृषी उत्पादनात मोडत नाही 

ऊसाचा रस हा कृषी उत्पादनात मोडत नाही. त्यामुळं जीएसटीसाठी तो पात्र ठरतो असे उत्तर प्रदेशात जीएसटी अ‍ॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीनं सांगितले आहे. दरम्यान, या निर्णयानंतर रस्त्यावरील गाड्यावरील ऊसाच्या रसावर जीएसटी असणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, यावर  कोणताही GST असणार नाही. . मात्र, हाच ऊसाचा रस जीएसटी क्रमांक धारण करणाऱ्या दुकानातून घेतला तर त्याच्या बिलात जीएसटी अंतर्भाव होऊ शकतो. 

उत्तर प्रदेशातील गोविंद सागर मिल्सचे ऊसाचा रस विकण्याचे नियोजन

महाराष्ट्रात ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळं राज्यात साखर आणि गुळाचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात होतं. असे असले तरी ऊसाचा रसही काढला जातो. रस छोट्या छोट्या स्टॉलवर ऊसाच्या रसाची विक्री केली जाते. मात्र, उसाचा रस हे कृषी उत्पादन नाही.  त्यामुळं ऊसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी भरावा लागेल,  असा निर्णय उत्तर प्रदेशात जीएसटी अ‍ॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने दिला आहे. व्यापारी तत्वावर जर ऊसाचा रस विकला जाणार असेल तर त्यावर हा जीएसटी द्यावाच लागेल, असे उत्तर प्रदेशात जीएसटी अ‍ॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने म्हटले आहे. ऊसाचा रस हा कृषी उत्पनात मोडत नाही. त्यामुळं जीएसटीसाठी तो पात्र ठरतो. उत्तर प्रदेशातील गोविंद सागर मिल्स या कारखान्याने ऊसाचा रस व्यापारी तत्त्वावर विकण्याचे नियोजन केले होते. त्यामुळं या रसावर जीएसटी लागू होईल का, याची अधिक माहिती घेण्यासाठी जीएसटी  ॲडव्हान्स रुलिंग ॲथॉरिटीकडे संपर्क केला. त्यावेळी ही बाब समोर आली आहे.

कृषी उत्पादनासाठी लागणाऱ्या अटींची पूर्तात होत नसल्यानं रसावर GST

ऊसाचा रस हा साखर कारखान्यात ऊसाचे गाळप करुन तयार केला जातो. तो शेतकरी तयार करत नाही. तसेच त्याचे स्वरुप आणि प्रक्रियाही बदलते. साखर, इथेनॉल तयार करण्यासाठी तो कच्चा माल ठरतो. त्यामुळं कृषी उत्पादनासाठी लागणाऱ्या तिन्ही अटींची पूर्तता यामध्ये होत नाही. त्यामुळं त्याच्यावर जीएसटी हा द्यावा लागेल असं मत जीएसटी ॲडव्हान्स रुलिंग ॲथॉरिटीनं व्यक्त केलं आहे.

news reels Reels

जीएसटी अ‍ॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीचं काम

तुम्ही घेणाऱ्या उत्पादनावर जीएसटी असेल की नाही याची माहिती जीएसटी अ‍ॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीकडून जाणून घेता येते. मात्र, ही माहिती आपल्याला कशी मिळणार, असा प्रश्न असतो. मात्र, सरकारने जीएसटी कोणत्या वस्तू आणि सेवांसाठी लागू होतो, याची माहिती देण्यासाठी एक सुविधा उपलब्ध केली आहे. ही सुविधा म्हणजे ॲडव्हान्स रुलिंग ॲथॉरिटी होय. या सुविधेच्या माध्यमातून कशावर किती टक्के जीएसटी लागू होईल, हे उत्पादन किंवा उद्योग सुरु करण्याआधी जाणून घेता येते.

महत्त्वाच्या बातम्या:

Health Tips : रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी ऊसाचा रस फायदेशीर, शरीराला मिळतात ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here