मुंबई : मार्च महिना संपून आता एप्रिल महिन्याची सुरुवात झाली. नवीन आर्थिक वर्षाचा आज पहिला दिवस असून जर तुम्ही गेल्या महिन्यात बँकेची कामे टाळली असतील, मग लवकरात लवकर काम उरका नाहीतर तुमच्या डोक्याला ताप होईल. कारण एप्रिल महिन्यात जवळपास १५ दिवस म्हणजे अर्धा महिना बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही यंदा घाई केली नाही तर नंतर तुम्हाला नाहक त्रास सहन करावा लागेल. आजच्या काळात इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगमुळे ग्राहक आपली बरीच कामे घरबसल्या करतात. पण मोठ्या प्रमाणात रोकड काढायची असल्यास किंवा डिमांड ड्राफ्टसारख्या इत्यादी कामांसाठी बँकेत तुम्हाला जावं लागतं.PPF खातेदारांना मोठा झटका, व्याजदरा संदर्भात सरकारचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) एप्रिल महिन्याच्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. मात्र, ऑनलाइन बँकिंग सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. आजपासून सुरु होणाऱ्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वीकेंडसह ७ दिवस बँकांचे कामकाज बंद राहील. त्यामुळे, जर तुम्हाला पुढील आठवड्यात बँकेशी संबंधित कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बँकेच्या शाखेत जायचा विचार करत असेल, तर तुम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे १ एप्रिल ते ८ एप्रिल या कालावधीत तुमच्या शहरातील शाखा किती दिवस बंद राहतील याची नोंद करून घ्यावी.

गुड न्यूज! नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिलासा; सिलिंडर दरात मोठी घट; पाहा नवे दर
एप्रिल महिन्यातील सुट्ट्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर जाणून घ्या
१ एप्रिल: वार्षिक मेंटेनन्ससाठी बँका बंद राहतील.
२ एप्रिल: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
४ एप्रिल: महावीर जयंती
७ एप्रिल: गुड फ्रायडेनिमित्त आगरतळा, अहमदाबाद, गुवाहाटी, जयपूर, जम्मू, शिमला आणि श्रीनगर वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
८ एप्रिल: महिन्याचा दुसरा शनिवार
९ एप्रिल: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
१४ एप्रिल: बाबासाहेब आंबेडकर जयंती
१६ एप्रिल: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
२२ एप्रिल: महिन्याचा चौथा शनिवार
२३ एप्रिल: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
३० एप्रिल: रविवार (साप्ताहिक सुट्टी)

कोरडवाहूनं डोळ्यात पाणी आणलं, पण हार न मानता पठ्ठ्याने जोडधंद्यातून शोधला समृद्धीचा मार्ग

दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या सुट्टीच्या यादीनुसार एप्रिल महिन्यात दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळून एकूण १५ दिवस बँका बंद राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here