लखनऊ: उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये एका मुलीला तिची सवय महागात पडली. पोटदुखीची समस्या असल्यानं कुटुंबीय मुलीला डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली. त्यांनी कुटुंबीयांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. यानंतर कुटुंबीयांनी शस्त्रक्रियेची तयारी दर्शवली. डॉक्टरांनी कित्येक तास शस्त्रक्रिया केली. आपला अनुभव पणाला लावून त्यांनी मुलीच्या पोटातून केसाचा एक मोठा गोळा बाहेर काढला. त्या गोळ्याचं वजन २ किलोहून अधिक भरलं.डॉक्टरांनी पोटातून केसांचा गोळा बाहेर काढल्यानंतर मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. मुलीची प्रकृती उत्तम असून सध्या ती रुग्णालयात आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले असून त्यांच्या कौशल्याचा कौतुक केलं आहे. बिजनौर शहरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीला केस खाण्याची सवय होती. गेल्या अनेक वर्षांपासून ती गुपचूप केस खायची. त्यामुळे तिच्या पोटात केसांचा मोठा गोळा तयार झाला. त्यामुळे वारंवार तिचं पोट दुखायचं, उलट्या व्हायच्या. मुलीनं काहीही खाल्लं तर तिला उलटी व्हायची.
जोडप्याच्या खोलीत रात्री आक्रोश, शेजारी खिडकीत डोकावले; मुलगा दिसला, ३८ सेकंदांत ४७ वेळा…
मुलीची प्रकृती बिघडू लागल्यानं तिच्या वडिलांनी तिला प्रकाश रग्णालयात दाखल केलं. डॉक्टर प्रकाश यांनी अल्ट्रासाऊंडच्या माध्यमातून पोटाची तपासणी केली. तेव्हा त्यांना केसांचा मोठा पुंजका दिसला. केसांची मोठी गाठ मुलीच्या पोटात तयार झाली होती. केस खाण्याची सवय हा आजार आहे. याचं प्रमाण महिलांमध्ये अधिक आहे. हा आजार मानसिक स्वरुपाचा आहे, असं डॉ. प्रकाश यांनी सांगितलं.

सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?

केस खाण्याची सवय असल्यास पोटात केसांचा मोठा पुंजका तयार होतो. पुढे त्याची गाठ तयार होते. त्याला वैद्यकीय भाषेत ट्रायकोबेजार म्हटलं जातं. डॉ. प्रकाश यांनी मुलीच्या पोटातून काढलेल्या केसांच्या गोळ्याचं वजन २ किलोच्या आसपास आहे. डॉक्टरांनी केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे मुलीची प्रकृती बरी आहे. तिचा पोटदुखीचा त्रास बंद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here