कोलकाता नाईट रायडर्स (KKR Probable Playing 11)
सलामीवीर- रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर
मधल्या फळीतील फलंदाज- नारायण जगदीशन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग
अष्टपैलू- आंद्रे रसेल, सुनील नरेन
गोलंदाज- शार्दुल ठाकूर, लोकी फर्ग्युसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती
कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, नारायण जगदीशन, नितीश राणा(कर्णधार) , रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती
पंजाब किंग्ज (PBKS Probable Playing 11)
सलामीवीर – शिखर धवन, प्रभसिमरन सिंग
मधल्या फळीतील फलंदाज – भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, जितेश शर्मा
अष्टपैलू- सॅम कुरन, हरप्रीत ब्रार
गोलंदाज- राहुल चहर, अर्शदीप सिंग आणि नॅथन एलिस
पंजाब किंग्जचे संभाव्य प्लेइंगइलेव्हन :
शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम कुरान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस.
पिच रिपोर्ट
मोहालीच्या पीसीए स्टेडियमच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणे पसंत केले जाते. या मैदानावर एक उच्च स्कोअर सामना पाहिला जातो. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला खेळपट्टीवरून अतिरिक्त मदत मिळू शकते, परंतु जसजसा खेळ पुढे जाईल तसतसे फलंदाजांना धावा काढणे सोपे होत जाते.
या मैदानावर आतापर्यंत झालेल्या ९ सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने ५ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर नंतर फलंदाजीला आलेल्या संघाने ४ सामने जिंकले आहेत. या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना संघाची सरासरी धावसंख्या १६८ च्या आसपास आहे.
अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं
असं असेल हवामान
या सामन्याआधी पंजाबमधील वातावरण खूपच थंड आहे. सामन्यापूर्वी संततधार पावसाने दणका दिला आहे. त्याचवेळी १ एप्रिल रोजी पावसाची शक्यता आहे. पावसाची ५० टक्के शक्यता आहे. अशा स्थितीत दुसऱ्या सामन्यात पाऊस अडचणीत आणू शकतो. सर्वोच्च तापमान २३ अंशांपर्यंत राहू शकते.