ipl dhoni 2023, आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात धोनीचा जलवा; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है! – ms dhoni hit a six in the 20th over of the ipl 2023 opening match
गुजरातः आयपीएलच्या १६ व्या सीझनची रणधुमाळी कालपासून सुरु झाली आहे. या सीझनची पहिला सामना चेन्नई सुपरकिंग आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स संघाने शुक्रवारी आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या लढतीत चेन्नईवर पाच विकेटनी मात केली. सुरुवातीला २० ओव्हरमध्ये ७ बाद १७८ अशी धावसंख्या उभारली होती. याचवेळी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा जुना अंदाज पाहायला मिळाला. धोनीने लगावलेल्या सिक्सने उपस्थितांचेही मन जिंकले होते. सामन्यादरम्यान आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या धोनीने ७ चेंडूमध्ये १४ धावा काढल्या. यावेळी त्याने एक छक्का आणि एक चौका लगावला. शेवटच्या ओव्हरमध्येच दोन्ही छक्का आणि चौकाची बरसात केली. यावेळी धोनीने लगावलेला छक्का पाहून क्रिकेटप्रेमींना पूर्वीचा धोनी आठवला. सोशल मीडियावर या व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.
गुजरात टायटन्सकडून जोशुआ लिटिल शेवटची ओव्हर खेळत होता. लिटिलने या ओव्हरमध्ये एकूण १३ रन दिले. धोनीने नाबाग १४ धावा काढल्या. तर, यावेळी सामन्यात चेन्नईचा फलंदाज ऋतुराज गायकवाडचाच बोलबाला पाहायला मिळाला. ऋतुराजने ९२ धावा काढल्या. ऋतुराजने या सामन्यात ४ चौके आणि ९ धक्के लगावले. त्याने यंदाच्या स्पर्धेतील पहिल्याच चेंडूवर चौकार मारून पहिल्या षटकात १५ आणि दुसऱ्या षटकांत १७ धावा वसूल केल्या. ‘नो बॉल’ ठरण्याची शक्यता असलेला फुल टॉस फटकावला आणि तो त्यावर बाद झाला. त्याने संघाच्या १५१ पैकी ९२ धावा केल्या होत्या.