पिंपरी: भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवर पाठीमागे बसलेली १३ वर्षीय मुलगी खाली पडली. तिच्या अंगावरून डंपरचे मागचे चाक गेल्याने त्यात चिरडून तिचा मृत्यू झाला. हा भीषण अपघात आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास येथील मोरया पार्कजवळ झाला. ( )

वाचा:

विभुती संजय साफरिया (वय १३, रा. चिखली), असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. गणेश राजाराम वगरे (वय २७ रा. थेरगाव) असे डंपर चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय साफरीया व त्यांची मुलगी विभुती हे दोघे पिंपळे गुरव येथील येथे त्यांच्या नातेवाईकाकडे आले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास संजय साफरीया व दुचाकीवरून येथे जात होते.

वाचा:

मोरया पार्क येथील मुख्य रस्त्यावर डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीवर मागे बसलेली विभुती खाली पडली. डंपरचे मागचे चाक तिच्या अंगावरून गेले. त्यामुळे विभुतीचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही वेळासाठी या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली. त्यानंतर मृतदेह पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आला. डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here