रायगड/श्रीवर्धनः रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बोर्ली रस्त्यावरती रात्री नऊ वाजताच्या सुमारास श्रीवर्धन वेळास आणि वडवली गावाच्या मधे भल्ला पेट्रोल पंपासमोर एका विचित्र अपघाताची घटना घडली आहे. दोन मोटारसायकल समोरा समोर धडकून मोठा अपघात घडला आहे. बुधवारी रात्री झालेल्या या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला आहे. मोटार सायकलची रस्त्यावरून येणाऱ्या पदचाऱ्याला जबर धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की अपघातग्रस्त यांचा मृत्यू झाला आहे. वडवली गावातील रहिवासी आतिश महेश नाकती वय वर्ष ३० हा तरुण आपली होंडा कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक MH ०६ BR ८९९८ घेऊन वेळासवरून बोर्लीच्या दिशेने येत होता. त्याच वेळी इग्बाल शरफुद्दिन गझगे (वय वर्ष ५५) राहणार गोंडघर हे बोर्लीच्या दिशेने पायी चालत येताना त्यांना भल्ला पेट्रोल पंपासमोर आतिश नाकती याच्या मोटरसायकलची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, दोघेही रस्त्यावर जखमी होऊन पडले. डोक्याला जबर मार लागल्याने आतिश नाकती जागीच बेशुद्ध पडला तरइक्बाल शर्फुद्दिन यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. मोटार सायकलची अवस्था पाहून या भीषण अपघाताची गंभीरता दिसून येत होती.

करोना आणि इन्फ्लुएन्झाची लक्षणे संमिश्र, रुग्ण ओळखणार कसा?; डॉक्टरांनी शोधला उपाय
अपघाताची माहिती मिळताच दिघी सागरी बोर्ली पंचातन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.प्रसाद ढेबे यांनी टीमसह घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही अपघातग्रस्तांना गंभीर दुखापत झाल्याने तातडीने बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच दुर्दैवाने आतिश नाकती याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. तर दुसरीकडे इक्बाल शर्फुद्दिन गझगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पनवेल येथे हलविण्यात आले. मात्र काही अंतरावर पेण शहराजवळच त्यांनी आपले प्राण सोडले. या दुःखद घटनेने वडवली व गोंडघर गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी अधिक तपास बोर्ली पंचायतन पोलीस करत आहेत.

सर्वसामान्यांच्या खिशाला झळ; टाटा, बेस्टची वीज महागली, आजपासून असे असतील नवे दर

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रीकरणावेळी दरीत कोसळलेल्या युवकाचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here