अर्जुन राठोड, नांदेड : जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील तामसा येथे शुक्रवारी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आईचं निधन झाल्यानं माहेरी आलेल्या लेकीनं आईच्या पार्थिवाजवळच प्राण सोडले. एकाच घरात एकाच दिवशी दोन जणांचं निधन झाल्यानं शेवाळकर आणि जाधव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

जयमाला जाधव या त्यांच्या आई गयाबाई शेवाळकर यांच्या निधनाची बातमी कळताच माहेरी आल्या होत्या. आईच्या मृत्यूनंतर हंबरडा फोडत जयमाला जाधव यांनी आपले प्राण सोडले. जयमाला दिलीपराव जाधव या ५६ वर्षांच्या होत्या. जयमाला जाधव यांच्या आई गयाबाई किशनराव शेवाळकर यांचा शुक्रवारी वृद्धापकाळाने तामसा येथे निधन झाले होते. आईच्या निधनाची बातमी समजताच जयमाला जाधव या आईच्या अंत्यदर्शना साठी आपल्या माहेरी आल्या. माहेरी आल्यानंतर आईचे मृतदेह पाहताच मुलीला आश्रू अनावर झाले आणि मुलीने आईच्या पार्थिवावर हंबरडा फोडला.

आई आता माझे कसे होणार..मी आता कस जगू असं म्हणत जयमाला या गयाबाई यांच्या पार्थिवाजवळ चक्कर येऊन खाली पडल्या. जयमाला जाधव या बेशुद्ध झाल्याने त्यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचारा पूर्वीच जयमाला यांनी प्राण सोडले होते.

शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीची अपेक्षा पण दुसरेच दर वाढले, बियाण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार, नवं संकट
एकाच दिवशी घरात दोन मूत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आईच्या पार्थिवावर मुलीने प्राण सोडल्याच्या या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.

साहेबांचं जाणं चटका लावून गेलं; गिरीश बापट यांच्या निधनानं संदीप खर्डेकरांना अश्रू अनावर

धक्कादायक बाब म्हणजे जयमाला जाधव यांच्या पतीचे आठ महिन्या पूर्वी निधन झाले होते.सासू सासऱ्याचे देखील निधन झाल्याने त्या खचून गेल्या होत्या. आता त्यातच जयमाला यांचा देखील मृत्यू झाल्याने जाधव यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

काल जिंकले, आज धक्का; हार्दिक पांड्याच्या गुजरातला मोठा फटका; दिग्गज खेळाडू स्पर्धेबाहेर

माय लेकींच्या निधनानं तामसा गावावर शोककळा

नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील तामसा गावातील गयाबाई शेवाळकर आणि त्यांची मुलगी जयमाला जाधव यांचं निधन झाल्यानं तामसा गावावर शोककळा पसरली. एकाच दिवशी माय लेकींच्या मृत्यूमुळं शेवाळकर आणि जाधव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

Adani Crisis: गौतम अदानींच्या अडचणी वाढल्या; आता SEBI इन ॲक्शन मोड, पाहा नवीन घडामोड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here