नवी दिल्ली : जर तुम्हाला बचत योजनेत गुंतवणूक करायची असल्यास तुमच्यासाठी FD (मुदत ठेव) की छोटी बचत योजना फायद्याची? ज्यामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळेल. सरकारने शुक्रवारी लहान बचत योजनेवरील व्याजदरात वाढ जाहीर आहे. तर गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने देखील रेपो दरात वाढ केल्यापासून बँका देखील मुदत ठेवींच्या व्याज दरातही वाढ करत आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूक करण्याची एक चांगली संधी आहे. दरम्यान, एक गोष्ट स्पष्ट करायचे की बँकांनी एफडीवर व्याजदर वाढवले आहेत परंतु अनेक लहान बचत योजनांवरील व्याजदर अजूनही यापेक्षा जास्त आहेत.

सरकारने १२ पैकी १० लहान बचत योजनेचा व्याजदर वाढवला असून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) योजनेत पुढील तिमाहीत जुन्या ७.१ टक्के दरानेच व्याज मिळेल. विशेष म्हणजे पीपीएफचे व्याज कराच्या कक्षेत येत नाही, पण एफडीच्या व्याजावर कर आकारला जातो. ५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ७ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या FD वर ३ ते ७% दराने व्याज दिला जात आहे. त्याचबरोबर, ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी ३.५ ते ७.५% व्याज मिळेल. तसेच एफडी व्यतिरिक्त काही मोठ्या बँकांद्वारे बचत खात्यांवर दिले जाणारे व्याज पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याज दरांपेक्षा कमी आहे.

खुशखबर! आता लहान बचत योजनांमधून होईल मोठी कमाई, नवीन वर्षात व्याजदर वाढला
पोस्ट ऑफिस बचत खाते सध्या वार्षिक ४% व्याज देत असून एसबीआय त्यांच्या बचत खात्यांवर २.७०% वार्षिक व्याज देत आहे. त्याचप्रमाणे ICICI बँक वार्षिक ३-३.५ टक्के व्याज देत आहे.

छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक आता होणार आणखी सोपी, फक्त कागदपत्र जोडून होईल काम
लहान बचत योजनांवरील व्याजदर वाढला
सरकारने शुक्रवारी लहान योजनांवरील व्याजदरात वाढ केली. यामध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी (SSY) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) सारख्या योजनांचा समावेश आहे. सरकारने या योजनांवरील व्याजदर ०.७०% पर्यंत वाढवला असून वाढीव व्याजदर एप्रिल ते जून २०२३ या तिमाहीसाठी लागू होतील. सरकारने गेल्या ९ महिन्यांत तिसऱ्यांदा छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात बदल केलेला आहे. व्याजदरात वाढ झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर सर्वाधिक ८.२ टक्के तर सुकन्या समृद्धी योजनेत ८% सर्वाधिक व्याज निश्चित करण्यात आले आहे.
सरकारची जोरदार योजना! महिलांसाठी गुंतवणुकीचा सुरक्षित, उत्तम पर्याय; वाचा संपूर्ण तपशील
मात्र, सरकारने सलग दुसऱ्यांदा पीपीएफच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. गेल्या वेळी जानेवारीच्या तिमाहीत देखील. वित्त मंत्रालयाने पीपीएफ योजनेवरील व्याजदर स्थिर ठेवला होता. म्हणजे पीपीएफ योजनेवर गेल्या तिमाहीप्रमाणे ७.१ टक्के व्याज मिळेल. याशिवाय बचत ठेव योजनेच्या व्याजदरात देखील वाढ करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here