MLA Rohit Pawar: कर्जत तालुक्यातील १० हजार विद्यार्थ्यांना आमदार रोहित पवार यांच्याकडून सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी एका विद्यार्थींनीने त्यांना पत्र लिहले.

कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथील तृप्ती थिटे या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने याबद्दल आमदार पवार यांना आभाराचे पत्र लिहिले आहे. एवढेच नव्हे तर एक मोठी मागणीही केली आहे. पवार यांनी हे सोशल मीडियात शेअर करून या विद्यार्थ्यानीचे आभार मानले आहेत.
तृप्ती हिने पत्रात म्हटले आहे की, तुम्ही सायकली दिल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. तुम्ही आमच्या भविष्यासाठी एक दूत आहात, याची खात्री पटली आहे. कर्जत-जामखेडच्या विकासासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात. आमची स्वप्न तुम्ही पूर्ण करताना दिसत आहात. आता कर्जतमध्ये एक भव्य मेडीकल कॉलेज उभे राहावे, अशी आमची इच्छा आहे. आमची ही इच्छा तुम्ही पूर्ण कराल, याची खात्री आहे. तुम्ही आमच्या भागासाठी काम करीत आहात, याचा आम्हा लहान मुलांनाही खूप आनंद वाटत आहे, असेही तिने म्हटले आहे.

आमदार पवार यांनी यावर म्हटले आहे की, तृप्तीसारख्या हजारो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवणं यांच्यासारखं दुसरं समाधान नाही. हे आनंदाचे आणि समाधानाचे क्षण अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल खरं म्हणणे मीच या मुलांचे आभार मानायला हवेत, असेही पवार यांनी म्हटले आहे.
आज्जे काळजी करू नको मी आहे; जामखेड दौऱ्यादरम्यान रोहित पवारांकडून एका आजीला गुडघ्याचे उपचार
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.