नवी दिल्ली : देशांतर्गत शेअर बाजारात गुंतवणूक करून कोट्याधीश बनलेले अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. अस्थिर आणि धोकादायक मानल्या जाणाऱ्या शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना रडवलं तर अनेक असे शेअर्सनी गुंतवणूकदारांना कोट्यवधींची कमाई करून दिली आहे. गोदरेज कंज्यूमर प्रोडक्ट्सचा शेअर देखील असाच आहे. गोदरेज कंज्युमर प्रोडक्ट्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला असून या स्टॉकमध्ये एक लाखाची गुंतवणूक करणारे आज कोट्याधीश बनले आहेत. आणि अजूनही हा शेअर तुफान तेजीने वाटचाल करत आहेत.

हिंडेनबर्ग अहवाल अन् अदानी साम्राज्य आपटला, दोन वर्षाची घोडदौड थांबली; शेअर्सची चमक पडली फिकी
बाजार एक्स्पर्टनुसार स्टॉकमध्ये पुढे देखील तेजीत व्यवसाय होताना दिसत आहे. शुक्रवारी गोदरेज कंज्यूमर प्रोडक्ट्सचा स्टॉक ९६८.०५ रुपयांच्या पातळीवर वाढीसह बंद झाला असून स्टॉकमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, जर तुम्ही पण कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर त्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा कारण बाजारातील गुंतवणूक धोक्याच्या अधीन आहे आणि तुम्हाला फायदा होण्याबरोबर अर्थी फटकाही बसू शकतो.

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठया हालचाली, अंबानींच्या शेअरने नशीब पालटलं, पाहा आज काय घडलं
मल्टीबॅगर गोदरेज कंज्यूमर प्रोडक्ट्सचा स्टॉक
या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात श्रीमंत केले आहे. २२ जून २००१ रोजी कंपनीचा स्टॉक ४ रुपयावर व्यवहार करत होता. तर सध्या कंपनीचा स्टॉक रु. ९६८च्या पातळीवर स्थिरावला आहे. अशा स्थिती, गेल्या २२ वर्षात स्टॉकमध्ये २३,०००% हून अधिक वाढ झाली आहे. अशा स्थितीत जर एखाद्या गुंतवणूकदाराने २००१ मध्ये या स्टॉकमध्ये १ लाखाची गुंतवणूक केली असेल तर आज त्याला २ कोटींचा परतावा मिळाला असेल.

महत्त्वाची बातमी! सरकारचा सर्व अधिकाऱ्यांना आदेश, शेअर बाजारात पैसे गुंतवले आहेत तर…
अल्पावधीतही शेअरची कमाल
दुसरीकडे, या स्टॉकने फक्त आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना कोट्याधीश बनवले असे नाही. तर अल्पावधीत देखील गुंतवणूकदारांचा खिसा भरला आहे. गेल्या वर्षी ३० मार्च रोजी शेअर ७०० रुपयाचा पातळीवर व्यवहार करत होता. अशा स्थितीत स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारना अल्पावधीत देखील ३९% असे जोरदार रिटर्न दिले आहे. याशिवाय आगामी काळात देखील स्टॉकमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता एक्स्पर्टसनी वर्तवली आहे.

(टीप: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. बाजारातील गुंतवणुकीने तुमचे नुकसानही होऊ शकते.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here