राहुल गांधींच्या नावे केले या महिलेने आपले चार मजली घर; पाहा, हे घर नेमके आहे कुठे – a delhi woman gives her 4 storey house to rahul gandhi after he received a notice to vacate government bungalow
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस मिळाल्यानंतर दिल्लीतील एका महिलेने तिचे चार मजली घर राहुल गांधींच्या नावावर केले आहे. राजकुमारी गुप्ता असे या महिलेचे नाव असून त्यांनी दिल्लीतील मंगोलपुरी भागात असलेले आपले ४ मजली घर राहुल गांधी यांच्या नावावर केले आहे. राजकुमारी गुप्ता या दिल्ली काँग्रेस सेवादलाशी संबंधित आहेत. लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २२ एप्रिलपर्यंत सरकारी बंगला खाली करण्यास सांगण्यात आले आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेचे सदस्यत्व गमावल्यानंतर काँग्रेसने ‘मेरा घर, राहुल गांधी का घर’, असा प्रचार केला. राहुल गांधी यांना गेल्या आठवड्यात लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, गृहनिर्माण समितीने राहुल गांधी यांना १२ तुघलक लेन येथील त्यांचा सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस पाठवली आहे. खेळता खेळता शाळेच्या संरक्षक भिंतीला धक्का लागला, भिंत अंगावर कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू गुजरातमधील सुरत येथील न्यायालयाने २३ मार्च रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवले आणि त्यांच्या ‘मोदी’ आडनावावर केलेल्या टिप्पणीवर २०१९ मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणात त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली गेली. दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ मार्च रोजी त्यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले.