रत्नागिरी : भारत-सीमेवर झालेल्या भूस्खलनात चिपळूणचे सुपुत्र सुभेदार अजय शांताराम ढगळे शहीद झाले आहेत. भारत-चीन सीमेवर रस्ता बनविण्यासाठी जागेची रेकी करण्यासाठी मोरवणे गावचे सुपुत्र व चिपळूण येथील माजी सैनिकी मुलांचे वसतीगृहाचे छात्र सुभेदार अजय शांताराम ढगळे हे गेले होते. त्याचवेळी सततचा पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे २४ मार्च रोजी सिक्किममध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. त्यात सुभेदार अजय ढगळे व त्यांच्या बरोबर असलेले चार जवान शहीद झाले. ते मातीच्या व बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेची माहिती मिळताच भारतीय सेना दलाने सहा दिवस त्यांना शोधले आणि अथक प्रयत्न करून भारतीय सेनेच्या बहादूर सैनिकांनी चिखल, दगड आणि बर्फाच्या खाली असलेल्या बहादूर शहीद सुभेदार अजय ढगळे व इतर चार जवानांना आपल्या प्राणांची बाजी लावून शोधून काढले. शहीद अजय ढगळे हे कारगील लढाईत टायगर हिल जिंकणाऱ्या बहादूर पथकाचा सुद्धा हिस्सा होते. त्यांचा पार्थिव देह सोमवारी मोरवणे गावी आणण्यात येणार आहे.

राहुल गांधींच्या नावे केले या महिलेने आपले चार मजली घर; पाहा, हे घर नेमके आहे कुठे
अजय ढगळे यांचे पार्थिव आज संध्याकाळी तवंगला आणण्यात येताहे. मोसम खराब असल्यामुळे रस्तेमार्ग उद्या संध्याकाळी त्यांचे पार्थिव गुवाहाटीला आणले जाईल. त्यानंतर गुवाहाटीवरून सोमवारी विमानाने पुणे येथे पार्थिव आणण्यात येईल. त्यानंतर पुणे येथून रस्तेमार्गे मोरवणे (धगळे वाड़ी, चिपळूण) येथे आणले जाईल.
खेळता खेळता शाळेच्या संरक्षक भिंतीला धक्का लागला, भिंत अंगावर कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू
सोमवारी अंत्यसंस्कार होण्याची शक्यता

शहीद अजय ढगळे यांच्या पार्थिवावर सोमवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते जवळ असलेल्या मोरवणे येथे त्यांच्या गावी त्यांचे आई-वडील असतात. तर त्यांची पत्नी व मुले मुंबईतील बोरिवली येथे वास्तव्यास आहेत.

साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी कारवाई; तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना दापोली पोलिसांकडून अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here